no images were found
६०० वर्षांपूर्वींची प्राचीन भगवान विष्णुची मूर्ती सापडली
ईरोड (कर्नाटक) येथील एका व्यक्तीच्या घरात जवळपास ६०० वर्षांपूर्वींची प्राचीन विष्णुची मूर्ती सापडली आहे. या मूर्तीची किंमत करोडोंच्या घरात आहे. परंतु मूर्ती ज्या व्यक्तीच्या घरी मिळाली ती व्यक्ती ती
ही मूर्ती परस्पर विकण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांना सुगावा मिळताच पोलिसांनी ताबडतोब धाड टाकून ही मूर्ती ताब्यात घेतली.
या मूर्तीची किंमत जवळजवळ करोडो रुपये आहे. ज्याच्या घरी हि मूर्ती मिळाली त्या व्यक्तीचे नाव आरएस पलानीचामी असून तो ईरोड येथे राहतो. आरएस पलानीचामी याच्याकडे भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचप्रमाणे ही मूर्ती विकण्याच्या तयारीत तो असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगबगीने सापळा रचत पलानीचामी व्यक्तीसोबत ओळख वाढवली. या मूर्तीची खरेदीसाठी सात नोव्हेंबरला वेषांतर करून पोलीस त्याच्याकडे रवाना झाले. त्यावेळेस त्या व्यक्तीने पोलिसांसमोर ती मूर्ती ठेवली. त्याने या मूर्तीची विक्रीसाठी ३३ कोटींची मागणी केली. दरम्यान १५ कोटींमध्ये मूर्तीची विक्री करण्यास तो तयार झाला होता. २२ किलो आणि ८०० ग्रॅम वजनाची ती मूर्ती ५८ सेमी उंच आणि ३१ सेमी रुंद अशी मूर्ती आहे. पनालीचामीने कित्येत वर्षे ती त्याच्याच घरात लपवून ठेवण्यात येत होती. ज्यावेळी त्याने मूर्ती वेषांतरीत पोलिसांसमोर ठेवली त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मूर्ती जप्त केली.
यासंबंधी पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, पलानीचामी हा मूर्ती विकण्याचा प्रयत्न करीत होता. आम्ही त्याला अटक करून ती मूर्ती कोणाची आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पोलिस तपासांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मांड्या येथे असलेल्या मंदिरातील पुजाऱ्याच्या मदतीने ही मूर्ती विकण्यात आली होती. पण ही मूर्ती त्याच मंदिरातील आहे का? याचा शोध घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारकडे ही मूर्ती पाठवण्यात आली आहे.