Home निधन वार्ता विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू

विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू

1 second read
0
0
24

no images were found

विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर :  प्रदीप जोतिराम कुंभार (वय 22, रा. कुंभार गल्ली, खुपीरे) याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. प्रदीपच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळे घरची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. तो सध्या मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे दुसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत एमआयडीसीमध्ये काम करीत होता. त्याचा पारंपरिक कुंभार व्यवसाय असल्याने तो व्यवसायासाठी आईला मदत करायचा. संक्रांतीसाठीची मातीची भांडी तयार करताना इलेक्ट्रिक चाकावर तो कुंभार काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला.

त्याने कुंभार कामासाठी बुधवारी स. ११ च्या सुमारास इलेक्ट्रिक व्हील ऑन केले. संक्रांतीसाठीची मातीची भांडी तयार करण्यासाठी त्याने चाकावर चिखल टाकला. त्याने चिखल टाकून त्यास स्पर्श करताच त्याला विजेचा जोरदार झटका बसला. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारील काही तरुण धावत आले. त्यांनी वीजप्रवाह ताबडतोब बंद करून प्रदीपला बाजूला केले. तो बेशुद्ध पडला. प्रदीपला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खुपीरे परिसरात प्रदीपच्या अशाप्रकारे मृत्युमुळे शोककळा पसरली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…