no images were found
लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचा खून, प्रियकर पसार
पुणे : तरुणाची वर्तणूक संशयास्पद दिसू लागल्याने तरुणीने लग्नाला नकार दिला. मुलामध्ये नकार पचवण्याची ताकद नव्हती म्हणून रागाच्या भरात त्याने तरुणीच्या शरीरावर वार करुन तिची हत्या केली. श्वेता रानवडे (वय २२ रा. औंध) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रतीक ढमाले, त्याचे वडील किसान ढमाले (वय ५० ), प्रतीकचा मित्र रोहित यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर औंध परिसरात एकाच खळबळ माजली आहे.
श्वेता रानवडेची आई दीपाली रानवडे (वय ४६ रा. सिद्धार्थ नगर औंध) यांनी चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्वेता रानवडे व प्रतीक ढमाले यांच्यामध्ये ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नास मान्यता दिली होती. मात्र, गेल्या वर्षापासून प्रतीक हा श्वेतावर संशय घेऊन त्रास देऊ लागला होता. कोणत्याही कारणावरून संशय घ्यायचा. प्रतीक याची वर्तणूक अचानक बदलल्यानंतर श्वेताने लग्नाला नकार दिला. याप्रकरणी प्रतीकचे वडील व प्रतिकचा मित्र तिला वारंवार धमकी देत तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. मात्र, श्वेता घेतलेल्या निर्णयावर ठाम होती.
श्वेता बुधवारी आई सोबत बाजारात गेली होती. घरी परतत असताना पार्किंगमध्ये प्रतीक तिची वाट पाहत होता. प्रतीकने तिला पार्किंगमध्ये गाठत तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिथून तो पसार झाला. श्वेता गंभीर जखमी झाली असता तिला रुग्णालयात नेतांना तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.