Home शासकीय कडेकोट बंदोबस्तात प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

कडेकोट बंदोबस्तात प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

1 second read
0
0
37

no images were found

कडेकोट बंदोबस्तात प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अफझल खानाचे आणि त्याच्या अंगरक्षकाचे थडगे सर्वांसाठी खुले करावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी देखील अनेक वेळा केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून जो पराक्रम केला होता, त्याचे स्मरण भावी पिढीला राहावे म्हणून प्रशासनाने या ठिकाणी सर्वांना जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत होती. अफझलखानाच्या कबरीला दिलेला पोलीस बंदोबस्त मागे घ्यावा. तसेच ही जागा सर्वसामान्यांना खुली करून या ठिकाणी अफजल खान वधाचे शिल्प उभारून त्यावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत महाराजांचा पराक्रम लिहावा, असा दबावही जिल्हा प्रशासन आणि सरकारवर टाकण्यात येत होता.
प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी हिंदुत्ववाद्यांची होती. मात्र हा विषय गुंतागुंतीचा असल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने आणि सरकारने या बाबत तटस्थ भूमिका घेतली. पण आता शिंदे-फडणवीस सरकारकडून पाऊल उचलण्यात आले असून कारवाई करण्यात येत आहे
अफझल खानच्या अनुयायांकडून थडग्याचे उदात्तीकरण करण्यात येतंय. यामुळे कबर परिसरात झालेले अवैध बांधकाम पाडण्यात यावे, अशा मागणीने जोर धरला होता. आता शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात अखेर कारवाई सुरू झाली आहे. अफजल खान कबर परिसरात बांधण्यात आलेल्या १९ अनधिकृत खोल्या पाडण्यात येत आहे. हे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात येत आहे. हा विषय संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी माध्यमांनाही प्रवेश नाकारला जात असून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईची विषेश बाब म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून इतिहास घडवला होता आणि नेमकी १० नोव्हेंबर २०२२ या आजच्या दिवशीच ही कारवाई केली जात आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…