Home मनोरंजन आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार!

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार!

0 second read
0
0
118

no images were found

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार!

‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीमसोबत रंगणार खास भाग

स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी हा कार्यक्रम महाराष्ट्रातला नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीममध्ये. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे. आजवर प्रेक्षकांनी माऊचा आवाज ऐकलेला नाही. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यांदाच माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

माऊची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकरसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गेले दोन वर्ष दिव्या माऊची व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. माऊ कधी बोलणार हा प्रश्न प्रेक्षक सतत विचारायचे. आता होऊ दे धिंगाणामुळे हा सुवर्णयोग जुळून आला आहे. ढोल ताश्यांच्या गजरात माऊची एण्ट्री होणार आहे. खरतर या कार्यक्रमातच खूप सारी ऊर्जा सामावलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव तर सळसळता उत्साह आहेत. या मंचामुळे माऊची बोलण्याची इच्छा पूर्ण होणार आहे अशी भावना दिव्याने व्यक्त केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात

‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे ‘बाप्पाचा मान’ उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात…