no images were found
‘हप्पू की उलटन पलटन’मधील दबंग जोडी पोहोचली काशीनगरीला
एण्ड टीव्हीवरील ‘घरेलू कॉमेडी’‘हप्पू की उलटन पलटन’भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कपाळावरून येणारे तेलकट केस, तोंडामध्ये चघळणारे पान, वैशिष्ट्यपूर्ण मिशी व धमाल ढेरपोट्या दरोगा हप्पू सिंगने (योगेश त्रिपाठी) प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट केले आहे. ही मालिका दरोगा हप्पू सिंग, त्याची ‘दबंग दुल्हनिया’राजेश (कामना पाठक),हट्टी आई कटोरी अम्मा (हिमानी शिवपुरी)आणि त्याच्या नऊ खोडकर मुलांच्या विलक्षण कृत्यांना सादर करते. याअत्यंत लोकप्रिय दबंग जोडीने काशीनगरीला भेट देऊन स्थानिक देवदिवाळी उत्सवाचा आनंद घेतला, अनेक घाटस्थळी गेले, गंगानदीच्या काठी बोट रायडिंगचा आनंद घेतला, स्वादिष्ट स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला आणि शहरातील प्रसिद्ध स्टोअर्समध्ये खरेदी केली.
वाराणसीला दिलेल्या भेटीबाबत सांगताना योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, “सर्व काशी रहिवाशांना देवदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!आमची मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’चे उत्तरप्रदेशमध्ये निष्ठावान चाहते आहेत, याच कारणामुळे आम्ही घाटचे शहर वाराणसीला भेट देऊन येथील प्रेक्षकांसोबत संवाद साधण्याचे ठरवले. वाराणसी हे भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे आणि येथे जगप्रसिद्ध मंदिरे आहेत, जी लाखो भक्तांचे लक्ष वेधून घेतात. आणि यासाठी देवदिवाळीसारखा उत्तम क्षण कोणताच नाही, जेथे अद्वितीय व अचंबित करणारे सेलिब्रेशन पाहायला मिळाले. आम्ही जेथे जातो तेथे आमचे चाहते आम्हाला आमचे धमाल संवाद व माझा प्रसिद्ध संवाद ‘अरे दादा!’म्हणत अभिवादन करतात, ज्यामुळे मला खूप आनंद होतो. मी आमच्या कामाचे कौतुक करण्यासाठी प्रेक्षकांचे आभार मानतो आणि आम्ही प्रेक्षकांचे अधिकाधिक विनोदी एपिसोड्ससह मनोरंजन करत राहण्याची आशा व्यक्त करतो.’’