
no images were found
बेळगावी येथे 15 डिसेंबर रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर: बेळगावी (कर्नाटक) येथे रक्षालेखा प्रधान नियंत्रक कार्यालय यांच्याव्दारे जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांचे अवलंबीत यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन व रेकॉर्ड कार्यालयामार्फत स्टॉल, सैन्य प्लेसमेंट नोड, पी.सी.डी.ए. पेंशन प्रयागराज येथील अधिकारी याबाबत अडी अडचणींचे निराकरण करण्यासाठी दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 ते 4 वाजेपर्यंत, शिवाजी स्टेडीयम, बेळगावी येथे पेन्शन अदालत, वेटरन मेळावा घेण्यात येणार आहे. ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता यांच्या अडी अडचणी बाबतची सविस्तर माहिती व आपले तक्रार अर्ज, त्यासोबत आपली कागदपत्रे 8317350584 या व्हाट्ॲप क्रमांकवर पाठवावीत, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही डॉ. चवदार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.