
no images were found
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये जागतिक अन्न दिवस साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधि): शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामध्ये दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी अन्न तंत्रज्ञान विभाग , AFST(I) कोल्हापूर चॅप्टर, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठाच्या IISC आणि SCII यांच्या संयुक्त माध्यमाने जागतिक अन्न दिवस साजरा केला गेला. संपूर्ण जगभरात अन्नधान्याची नासाडी कमी करून ,पोषक व पुरेसा आहार या पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवास मिळावी या उद्देशाने त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जागतिक अन्न दिवस हा दरवर्षी १६ ऑक्टोबर केला जातो.यावर्षी जागतिक अन्न दिवस हा चांगल्या आयुष्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी अन्नाचा अधिकार” या विषयावर साजरा करण्याचे ठरवले आहे. या कार्याक्रमानिमित्त तंत्रज्ञान अधिविभागामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पोस्टर स्पर्धा,फूड मॉडेल,फूड प्रोडकट डेव्हलपमेंट,प्रश्नमंजुषा व वादविवाद स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र.कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी कार्यक्रमास भेट देऊन विद्यार्थ्याचे विशेष कौतुक व मार्गदर्शन केले.
मुख्य अतिथी डॉ.व्ही.एन.शिंदे (कुलसचिव ,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) आणि डॉ.शर्मिली माने (मुख्य कार्यकारी अधिकारी ,प्युअर मी ओर्गानिक्स,कोल्हापूर),डॉ. इराण्णा उडचाण (समन्वयक,अन्न तंत्रज्ञान शाखा, तंत्रज्ञान अधिविभाग)डॉ.जी.एस.कुलकर्णी(प्रोफेसर,स्थापत्य अधिविभाग), डॉ.एस.एम.गायकवाड(प्रशासकीय अधिकारी, तंत्रज्ञान अधिविभाग), यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ.व्ही.एन.शिंदे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व भावी अन्न वैज्ञनिकाना शाश्वत विकास कसा साधता येईल याचे मनन व चिंतन करण्यास उत्स्फूर्त केले. डॉ.शर्मिली माने यांनी गुळप्रक्रिया उद्योगातील अनुभव विद्यार्थ्याना सांगितले.यामध्ये
गूळप्रक्रिया उद्योगातील आव्हाने,त्यांची जास्त वेळ कशी साठवण करता येईल व शाश्वत विकास कसा साधता येईल याबद्दल त्यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.अन्न तंत्रज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. इराण्णा उडचाण यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश व रूपरेषा सांगितले. कार्यक्रमाची सांगता विजेत्यांना डॉ.जी.एस.कुलकर्णी (प्रोफेसर,स्थापत्य अधिविभाग), यांच्या हस्ते बक्षीसे देऊन करण्यात आली. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी शिक्षक व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले