
no images were found
२१ ऑक्टोबर रोजी काळसेकर पुरस्काराचे वितरण
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा २०२४ सालचा सतीश काळसेकर काव्य पुरस्कार ज्येष्ठ कवयत्री अनुराधा पाटील (संभाजीनगर ) यांना तर ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार वीरधवल परब (वेंगुर्ला) यांना जाहीर केला आहे. सदर पुरस्कार जेष्ठ साहित्यिक भारत सासणे आणि शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सोमवार दि. २१ ऑक्टोबर, २०२४ रोजी वि.स.खांडेकर भाषाभवन येथे सकाळी ११.३० वाजता सन्मानपूर्वक दिला जाणार आहे. या समारंभासाठी आदित्य काळसेकर यांच्यासह काळसेकर कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मराठी विभागप्रमुख प्रा. नंदकुमार मोरे यांनी दिली.