
no images were found
ओबीसी-मराठ्यांची एकजुट समाजभेद्यांचा पराभव करणार !- हेमंत पाटील
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. काही राजकीय पक्षाचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून सत्तेत येण्याची स्वप्न रंगवत आहेत. पंरतु, केवळ राजकारणासाठी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजभेद्यांना या निवडणुकीत मतदार राजा धोबीपछाड देईल, असे भाकित इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी वर्तवले.गेल्या काही काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मुद्दयावरून सामाजिक तेढ निर्माण करण्यात आली. ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष पेटवण्यात आला. पंरतु, आता पुरोगामी महाराष्ट्रात समाजासमाजात दरी निर्माण करणार्यांना जनताच घरचा रस्ता दाखवेल, असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.
ओबीसी-मराठा बांधवांच्या प्रश्नांना योग्य न्याय देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देतांना प्रामुख्याने ओबीसी-मराठा समाजाच्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला, तर राजकीय प्रतिनिधित्वाचा समतोल साधला जाईल. या समाजाच्या लोकसंख्येच्या आधारे त्यांना उमेदवारी द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले.
मनोज जरांगे पाटील येत्या दोन दिवसांमध्ये त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करतील. परंतु, ओबीसी-मराठा समन्वय समिती जरांगेच्या भूमिकेनूसार पुढील राजकीय निर्णय घेईल. किमान २५ ओबीसी उमेदवार देण्याची मागणी असून याअनुषंगने जरांगे यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याचे पाटील म्हणाले. जरांगेनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला तर आठवड्याभरात मतदार संघानिहाय उमेदवारांची यादी जाहिर होण्याची शक्यता देखील पाटील यांनी व्यक्त केली.