
no images were found
शिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवन इमारतीमध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. रामचंद्र पवार, पर्यावरण अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव,डॉ. पल्लवी भोसले, डॉ. रचना इंगवले यांच्यासह शिक्षक, अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी
आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.