no images were found
शाहू कारखान्याचा उपक्रम इतरांना प्रेरणादायी; राज्यात उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार – ॲड. जयश्री पालवे
कोल्हापूर : कागल येथील शाहू साखर कारखान्यामार्फत ऊस तोड कामगारांच्या बालकांसाठी चालवत असलेल्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर व हायस्कूल, कागल या स्तलांतरीत मुलांच्या हंगामी शाळेस राज्य बाल हक्क आयोगाच्या ॲड. जयश्री पालवे यांनी नुकतीच भेट कारखान्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
शाहू साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम हा इतरांसाठी प्रेरणा देणारा असून राज्य बाल हक्क आयोगाच्या माध्यमातून हा उपक्रम राज्यात राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या या भेटी प्रसंगी म्हणाल्या. सदस्या ॲड. पालवे नुकत्याच कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत असणारे मुलांचे निरीक्षण बालगृह कागल, जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना संच शिशुगृह मंगळवार पेठ कोल्हापूर, जिल्हा परिविक्षा अनुरक्षण संघटना संच मुलींचे निरीक्षण /बालगृह मंगळवार पेठ कोल्हापूर,अवनी संचलित बालगृह हणबरवाडी कोल्हापूर या संस्थांना भेटी दिल्या.
यावेळी त्यांनी बालकल्याण समिती, संस्था अधीक्षक, महिला व बाल विकास विभाग यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस. वाइंगडे, बाल कल्याण समिती सदस्य, संस्था अधीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.