no images were found
नीता शेट्टी म्हणते, “माझ्या पडद्यावरील कुटुंबियांसमवेत रील्स शूट करायला मला आवडते”
सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ ही एका सिंगल फादर जयदेव शर्मा (महेश ठाकूर)ची आणि त्याच्या तीन मुली दीपिका, तन्वी आणि धाकटी मुलगी पल्लवी यांच्यावरील त्याच्या प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी आहे. दीपिका शर्माची भूमिका करणाऱ्या नीता शेट्टीला प्रत्यक्ष जीवनात डान्स करायला खूप आवडते, पण या मालिकेच्या सेट्सवर ती आता ‘रील क्वीन’ बनली आहे. सध्याचे ट्रेंड कॅप्चर करण्यापासून ते आपल्या सह-कलाकारांसोबतचे सुंदर क्षण शेअर करण्यापर्यंत विविध विषयांच्या रील्स बनवून तिने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे. उत्तम डान्स व्हिडिओज आणि पडद्यामागच्या गंमतीजमतींद्वारे ती या मालिकेचे सार पडद्याच्या पलीकडे देखील जिवंत करते. आपल्या रील्समधून तिने अवस्थी परिवाराच्या गजबजलेल्या स्वयंपाकघरापासून ते शांतता देणाऱ्या लिव्हिंग रूमपर्यंत सेटचा प्रत्येक काना-कोपरा आपल्या रील्समधून दाखवला आहे.
आपल्या उत्साही स्वभावाला अनुसरून तिने प्रत्येक अभिनेत्यासोबत रोचक रील्स बनवल्या आहेत. या रील्समध्ये ती पल्लवीची सासू अपर्णा (कशिश दुग्गल) सोबत डान्स करते, चाची कुसुम (सोनाली नाईक) सोबत हास्यविनोद करते आणि रिंकू (प्रत्यक्ष बीएस) आणि राहुल (दर्श अग्रवाल) या मुलांसोबतचे मजेदार क्षण टिपते. तिचा पडद्यावरचा मेव्हणा राकेश (यश पंडित) सोबत ती छान छान रील बनवते पण पडद्यावरचा तिचा पती वरुण म्हणजे अभिनेता वसीम मुश्ताकसोबत शूटिंग करतानाचे जे क्षण तिने टिपले आहेत, त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दीपिकाची भूमिका करणारी नीता शेट्टी म्हणते, “मी जेव्हा सेटवर असते आणि माझ्या सीन्सची वाट बघत असते, तेव्हा माझ्यापाशी भरपूर वेळ असतो. अशा वेळी वेळ घालवण्यासाठी आणि माझा उत्साह सळसळत ठेवण्यासाठी मला रील्स शूट करायला आवडते. माझ्या फोनवर काही सेव्ह केलेले असतातच, त्यामुळे पटकन एखादा क्षण टिपता येतो. आणि त्याच वेळी जर माझे इतर सहकलाकार देखील मोकळे असतील तर त्यांनाही मी रील्समध्ये सामील करून घेते. त्यांनाही यात सामील व्हायला खूप आवडते. बऱ्याचदा तुम्हाला मी वरुण सोबत रील्स शूट करताना दिसेन, कारण बहुधा आमचे दोघांचे एकत्र सीन असतात. त्यामुळे जेव्हा दोन दृश्यांच्या मध्ये आम्हाला मोकळा वेळ असतो, तेव्हा मी त्याला बाजूला घेऊन जाते आणि आम्ही एकत्र रील्स शूट करतो. त्यालाही असे करताना मजा वाटते. अलीकडेच आम्ही ‘मछली छपाक’ वर बनवलेल्या रीलने 4.5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत आणि हा प्रतिसाद अफलातून आहे. लोकांना हे बघायला आवडते आहे हे पाहून बरे वाटते. माझ्यासोबत अत्यंत उत्साहाने या रील्स बनवणाऱ्या सह-कलाकारांबद्दल देखील मी कृतज्ञ आहे.”
वरुणची भूमिका करणारा वसीम मुश्ताक म्हणतो, “प्रतिभावान कलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते. पण जेव्हा ते रील्स बनवण्यात देखील उस्ताद असतात, तेव्हा हा आनंद दुप्पट होतो! रील्स बनवण्याच्या बाबतीत मी स्वतः जरा आळशीच आहे. पण, जेव्हा आम्ही एकत्र असतो, तेव्हा आम्हाला रील्स बनवायला खूप मजा येते. आमच्या चाहत्यांकडून देखील याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यांना या रील्स बघताना मजा येते हे कळल्यावर आम्हाला आणखी रील्स बनवण्यास प्रोत्साहन मिळते. एकत्र मिळून आनंद वाटणे, हास्य पसरवणे इतकाच आमचा उद्देश आहे.”