Home शैक्षणिक कोल्हापूर महानगरपालिकेचे राजमाता जिजाबाई गर्ल हायस्कूलचा 100 टक्के निकाल

कोल्हापूर महानगरपालिकेचे राजमाता जिजाबाई गर्ल हायस्कूलचा 100 टक्के निकाल

43 second read
0
0
41

no images were found

कोल्हापूर महानगरपालिकेचे राजमाता जिजाबाई गर्ल हायस्कूलचा 100 टक्के निकाल

 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे एकमेव राजमाता जिजाबाई गर्ल हायस्कूलच्या इयत्ता10 वीचा 100% निकाल लागला आहे. या शाळेने सलग तीन वर्षे 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. आजच्या निकालामध्ये श्रीराज युवराज भोसले 94.60% प्रथम,उत्कर्ष विनायक कांबळे 94.20% व्दितीय,सार्थक रविंद्र घाटगे 94.20% तृतीय,प्राची पांडुरंग गवळी 92.80% ,वेदांती अमोल कळंत्रे 92.80% ,प्रियांका सचिन जाधव 92.00%, अंकिता गजानन मोरे 91.60% ,शर्वरी सचिन चौगुले 89.80% गुण मिळविले.  तसेच इतर सर्व वि‌द्यार्थीनीनी 75% च्यावर घवघवित गुण प्राप्त केले आहेत.

            कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकमेव राजमाता जिजाबाई गर्ल हायस्कूलचा निकाल 100% लावण्यासाठी शाळेकडील मुख्याध्यापिका सौ.अंजली अशोक जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक याचे योगदान लाभले. यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुकत रविकांत आडसुळ व उप आयुक्त शिल्पा दरेकर व प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर हे यश मिळवण्यासाठी लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Load More Related Articles

Check Also

डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरची हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत भागीदारी 

डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरची हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत भागीदारी&n…