no images were found
पर्यावरण दिनानिमित्यआय.टी. असोसिएशन कोल्हापूर व महानगरपालिकेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कार्यकक्षेमध्ये सोमवार दि. 05 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ई वेस्ट विनामुल्य संकलित करण्याचे नियोजन आहे. याकरीता कोल्हापूर आय.टी. असोसिएशन व कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार आहे.
यामध्ये आय.टी. असोसिएशन, कोल्हापूर व महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने विभागीय कार्यालय क्र. 1 कार्यालयीन परिसर, विभागीय कार्यालय क्र. 2 छ. शिवाजी मार्केट इमारत पार्किंग, विभागीय कार्यालय क्र. 3 जगदाळे हॉल, राजारामपूरी 1 ली गल्ली, विभागीय कार्यालय क्र. 4 कार्यालयीन परिसर नागाळा हॉल, विवेकानंद कॉलेज समोर (संपर्क क्र. राहूल मेंच 9422416335, आय. टी. असो. 9561951003, आरोग्य विभागाचा व्हॉटस ऍ़प नंबर 9766532037 ) या ठिकाणी सकाळी 10.00 ते दूपारी 4.00 या वेळेपर्यं ई कचरा संकलित केला जाणार आहे. हा ई कचरा संकलना नंतर वाहतुक करुन याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपले कडील ई वेस्ट कचरा उपलब्ध असलेस नमुद ठिकाणी सुपूर्द करुन या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या मार्फत करण्यात आले आहे.