ड़ॉ अल्पना चौगुले यांच्या चित्रकृतीचे रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला होणार अनावरण कोल्हापूर ( प्रतिनिधी ): मुळच्या सातारच्या असणाऱ्या अल्पना चौगुले यांना चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण झाले नसताना व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अल्पना सोपान चौगुले यानी जलरंग माध्यमात शिवराज्याभिषेक सोहळा साकारला आहे .इतिहासाचा सखोल अभ्यास करुन वस्तुनिष्ठ पद्धतीने ही चित्रकृती साकारली गेली आहे . या चित्रकृतीला जनमान्यता मोठ्या प्रमाणात मिळत आहे . पण राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या चित्रकृतीला राजमान्यता मिळण्याची आवश्यकता आहे.जगभरात शिवछत्रपती ,त्यांची स्वराज्य निर्मिती आणि स्वराज्य निर्मितीचे प्रतीक मानला जाणारा शिवराज्याभिषेक सोहळा कैनवास वर ड़ॉ अल्पना चौगुले यानी वस्तुनिष्ठ रीतीने साकारला आहे . याला राजमान्यता लाभल्यास ही चित्रकृती घरोघरी पोहोचेल ,असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक ड़ॉ वसंतराव मोरे यानी आज पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केला . ड़ॉ अल्पना चौगुले यानी जलरंग या माध्यमाचा वापर करत तब्बल साड़े चार महीने कष्ट करत ही चित्रकृती साकारली . या चित्रकृतीचे अनावरण३५०व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडावर श्रीमंत छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते आणि श्रीमंत छत्रपती सौ.संयोगिता राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती ड़ॉ अल्पना चौगुले, ड़ॉ सोपान चौगुले आणि अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यानी या पत्रकार बैठकीत बोलताना दिली .