Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न

शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न

22 second read
0
0
28

no images were found

 

 

शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न

 

 

 

कोल्हापूर, (प्रतिनिधी):- शिक्षणाने प्रामाणिकपणा, करुणा आणि टीकात्मक विचारसरणीसारखे गुण जोपासले पाहिजेत, विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि कृपेने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले पाहिजे. शिवाजी विद्यापीठ शिक्षणाच्या समग्र दृष्टिकोनातून या तत्वज्ञानाचे उदाहरण देते. आपण पुढे जात असताना, मला विश्वास आहे की शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवेल आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील असा विश्वास महामहीम राज्यपाल तथा कुलपती, सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, कोल्हापूर ही महान शासक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे, जे देशभरात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांमध्ये प्रगतीशील धोरणांसाठी ओळखले जातात. त्यामुळे तुम्ही धैर्य, सामाजिक न्याय आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेच्या महान वारशाचे भाग्यवान वारसदार आहात.  यावेळी ६१ व्या दीक्षांत सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अर्थात एन.सी.एल.चे संचालक, ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ.आशिष लेले, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, उपस्थित मान्यवर, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, विद्यापीठ अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेचे सदस्य, विद्यापीठातील अधिकारी व प्रशासकीय सेवक, संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, उपस्थित स्नातक, विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभावेळी दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत गावून कार्यक्रमाला सुरूवात झाली. कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

       यावेळी महामहीम राज्यपाल तथा कुलपती, सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तुमच्यासोबत उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे. आजच्या दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. या विद्यापीठाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनाची आठवण करून देतो. कोल्हापूरमध्ये शेती, उद्योग, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६२ मध्ये झाली. तेव्हा विद्यापीठाशी संलग्न फक्त ३४ महाविद्यालये होती. उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी फक्त १४,००० होते. आज ६३ वर्षांनंतर, शिवाजी विद्यापीठात २९९ संलग्न महाविद्यालये आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या २.५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. आपली अंगभूत कौशल्ये, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेच्या बळावर जगभरात शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशंसनीय कामगिरी करीत आहेत. विद्यापीठाच्या लौकिकात आपणही निश्चितपणे मोलाची भर घालाल, याची मला खात्री आहे.                   राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक, ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ.आशिष लेले म्हणाले, विद्यापीठाने परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि कौशल्य प्रदान करण्यात उल्लेखनीय काम केले आहे. महाविद्यालयांचे विस्तृत जाळे केवळ या प्रदेशातील विविध पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा देत नाही, तर वैज्ञानिक कुतूहल आणि जिज्ञासेची संस्कृती देखील वाढवते. खरेच, शिवाजी विद्यापीठ या प्रदेशातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेचे दीपस्तंभ बनले आहे. ज्ञान, कौशल्ये आणि स्वतःवर दृढ विश्वास ठेवून जगात पाऊल ठेवताना, हे जाणून घ्या की भविष्य घडवायचे आहे. तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा, तुमच्या आवडींचे अनुसरण करा आणि तुमच्या आत असलेल्या अविश्वसनीय क्षमतेला कधीही विसरू नका. प्रा. डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मानले.

 

महामहीम राज्यपाल तथा कुलपती, सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते यांना प्रदान करण्यात आली पदवी –

राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, बंडू राजू कोळी जैवरसायनशास्त्र अधिविभाग, श्रीमती नोरोन्हा क्रिशा अल्दा (एम.ए.), सर्वा आरती पूनमचंद्र (एम.ए. हिंदी), घाशी साईसिमरन हिदायत (एम.ए. मास कम्युनिकेशन), ओगले आस्था गणेश (बी.ए. संस्कृत), पोळ धीरज विजयकुमार (एम.एस्सी. संख्याशास्त्र), पाटील पूजा गणपती (बी.एस्सी.), कोले प्रथमेश शशीराज (एम.कॉम), राक्षे गौरी विजय (बी. कॉम), बागवान आयेशा यासिन (एल.एल.बी.), पाटील शितल प्रशांत (मास्टर ऑफ लायब्ररी ॲण्ड इन्फॉरमेशन सायन्स), परीट रुतुजा बाबासो (बॅचलर ऑफ लायब्ररी ॲण्ड इन्फॉरमेशन सायन्स), बिंधुजा व्हीएस (मास्टर ऑफ सोशल वर्क), तेली अश्विनी तानाजी (डिप्लोमा इन क्लासिकल म्युझिक), वसेकर संतोष दादासाहेब (एम.एड.), हुदलीकर मेहक फिरोज (बी.एड.), लाड वैष्णवी विश्वास (बी. टेक.), कुरणे सौरवी रमेश (बी. आर्किटेक्चर).

 

पीएचडी धारक –

पाटील भगवान विलास, देसाई गौतम विकास, मोमीन आशिया मुनीर, भोसले तृप्ती साकेत, निकम पुर्वा पुंडलीक, शिंदे मनोज बाळासाहेब, तावडे अनिता कुंडलिक, जगताप रुध्दी राजेंद्र, कदम संजय वसंत, पाटील सुषमा विजयकुमार, लोहार शोभा नावजी, कांबळे हर्षवर्धन अप्पासो, सरदे श्रेनिक सुरेश, पाटील विनोद शंकरराव, कांबळे सुशांत सुभाष, कार्वेकर सुशील सुभाष, नदाफ सलमा हरुण, जाधव राहुल रामचंद्र, जगताप दिपाली नामदेव, व्हनगुत्ते प्रविण प्रकाश, देसाई रविंद्र मारुती, कळसगोंडा वैशाली परगोंडा, आवटी चेतन जयप्रकाश, जगताप सचिन हनुमंतराव, पाटील प्रसाद अनिल, कोळेकर अमोल हेमंत, लाटवडे सारीका जालिंदर, जाधव समाधान मधुकर, अत्तार तबस्सुम मुझफरहुसेन, वनिरे स्मिता अभिजित, मोरे बजरंग वामन, टिपर्से केशव धोंडीबा, तरळ विश्वनाथ तुकाराम, चंदगडकर मृण्मयी प्रसन्न, कुरणे मनिषा मधुकर, महाजन संगिता दादासो, माने विश्वासराव सदू, राजेयादव उदयसिंह मानसिंगराव.

      

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …