Home शासकीय १६१ गावांच्या क्लस्टर एसटीपी प्रकल्पाबाबत समन्वयाने नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१६१ गावांच्या क्लस्टर एसटीपी प्रकल्पाबाबत समन्वयाने नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1 second read
0
0
162

no images were found

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या क्लस्टर एसटीपी प्रकल्पाबाबत समन्वयाने नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नवनिर्मीत इचलकरंजी महानगपालिका क्षेत्रातील विकास कामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदार संघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्वाचे रस्ते विकास, पाणी पुरवठा तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रय़त्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

ऐतिहासिक माणगांव अस्पृश्य परिषदेच्या शताब्दी महोत्सवासाठी आणि वाटेगाव (ता. शिराळा) येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी उत्कृष्ट नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पंचगंगा नदी काठच्या १६१ गावांच्या सांडपाणी प्रक्रीयेसाठी क्लस्टर एसटीपी पद्धतीने आराखडे तयार करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.  हातकणंगले मतदार संघातील  ग्रामीण आणि नागरी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांच्यासह विविध विभागांचे सचिव स्तरीय अधिकारी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, इचलकरंजी महानगपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते. तसेच सांगली आणि विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, इचलकरंजी ही नवनिर्मीत महानगरपालिका आहे. या महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसह या परिसरातील विविध नगरपालिकांमधील विकास कामांना विविध योजनांमधून निधी देताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या विविध कामांसाठी, प्रकल्प आणि योजनांसाठी वेळेत प्रस्ताव सादर केले जावेत. प्रत्यक्ष कामांमध्येही दर्जावर लक्ष दिले जावे. या परिसरातील पर्यटन संधी विषयी आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागाने तज्ज्ञांची मदत घ्यावी. शिवराज्य भवन या योजनेतील कामांसाठी बांधकाम विभागाच्या सहभागातून एक टाईप प्लॅन तयार करून घ्यावा. जेणेकरून सर्वत्र एकाच प्रकारच्या इमारती व सुविधा निर्माण करता येतील. नगरपालिका क्षेत्रातील बाजारपेठांधील मुख्य बाजारपेठांच्या रस्तांचा एक मॉडेल पद्धतीने विकास करता येईल. त्यासाठी सुशोभिकरणासह उत्कृष्ट नियोजन करण्यात यावे,अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी हातकणंगले नगरपंचायतीसह, हुपरी, शिरोळ या नगरपालिकांना प्रशासकीय इमारतींसाठी निधीची उपलब्धता, इचलकरंजी महानगरपालिकेचा आकृतीबंध, शहरातील संभाजी महाराज पुतळा उभारण्याचा प्रकल्प, सेफ सिटी प्रकल्पातील कॅमेरे बसविण्याचा पुढचा टप्पा,  खिद्रापूर मंदिराच्या समावेशासह पर्यटन आराखडा तयार करणे, पन्हाळा-शाहूवाडी-आंबा टूरिस्ट सर्कीट, जयसिंगपूरसह विविध नगरपालिकांसाठी मंजूर रस्ते, सांडपाणी निचरा प्रकल्पांसाठीचा निधी आणि आराखडे,नगरपालिकामध्ये बाजारपेठांतील रस्त्यांचा विकास, इस्लामपूर, आष्टा येथील भूयारी गटारे, समाजकल्याण विभागांच्या संविधान भवन, तसेच शिवराज्य भवन, शिराळा येथील संभाजी महाराजांचा भुईकोट किल्ल्याचा विकास याबाबतची चर्चा झाली.  वस्त्रोद्योग उद्योजकांच्या अडचणी तसेच वीज बिल आणि छोट्या यंत्रमाग धारकांच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग, ऊर्जा विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड

 आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड       &n…