no images were found
लाइन दुरुस्त करणारे चार कर्मचारी टॅावर रेल्वेखाली चिरडले
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लासगाव येथे चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.हा अपघात आज ( सोमवारी ) सकाळी सहा वाजता अपघात झाला. रेल्वे लाइन दुरुस्त करणाऱ्या टॉवरने धडक दिल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात संतोष भाऊराव केदारे (वय३८), दिनेश सहादु दराडे ( वय३५), कृष्णा आत्मराम अहिरे ( वय ४०) संतोष सुखदेव शिरसाठ ( वय ३८) अशी चौघांची नावे आहेत.
लासलगाव रेल्वे स्थानकावर पहाटेच्या सुमारास टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. ट्रॅक मेंटन करण्याचे काम सुरु असताना सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्याना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावर रेल्वेने धडक दिल्याने अपघातात गॅंगमनचा मृत्यू झाला आहे. रेल्वेतील हे सर्व कर्मचारी आहे. सकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. याठिकाणी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचीही परिस्थिती नव्हती. त्यामुळे काही क्षणातच चौघांचा मृत्यू झाला.
या घटनेने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडले आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वे उशिराने पोहचणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मनमाड भुसावळ कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही उशिरा पोहचणार आहे.अपघात घडल्यानंतर बऱ्याच वेळ स्टेशन परीसरात मदतीसाठी रेल्वे पोलिसांसह आरोग्य पथक बोलावण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यानंतर पंचनामा आणि इतर माहितीसाठी धावाधाव सुरू झाल्याने आणि इंजिनही घटनास्थळी असल्याने रेल्वे सेवा काही तास ठप्प झाली होती.