no images were found
नागपुरात उद्या पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन
उद्घाटनाची भव्य तयारी- शिंदे-भाजपच्या झेंड्यांसह फुलांची आकर्षक सजावट
नागपूरः नागपूरमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन या महासोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे. नागपूर दौऱ्यावर येत असलेले मोदी मेट्रो आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. तसेच पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचं लोकार्पण होत असून या सोहळ्याची नागपूर शहरामध्ये तसेच ठीकठिकाणी जय्यत तयारी सुरु आहे. उद्घाटन सोहळ्याच्या जवळपास असलेल्या भागामध्ये शिंदे-फडणवीस यांचे फोटो असलेले मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्ग्ज तसेच अनेक मंत्री-आमदार, भाजपचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहील.
या मार्गावर ठिकठिकाणी टोल नाक्यापर्यंत भाजप व शिवसेनेचे झेंडे लावण्यात आलेले आहेत. या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आगमन होईल. नागपूर रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी ९.३० वाजता आगमन होईल. नागपूर रेल्वे स्टेशनवर आकर्षक अशी फुलांची सजवट करून हे रेल्वे स्टेशन सजवण्यात आलेले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नागपूर-विलासपूर वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवण्यात यईल. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाची शिर्डीमध्येही इंटरचेंजच्या ठिकाणी विशाल सभामंडप उभारून भव्य तयारी करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण शिर्डीत दाखवण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या फोटोचे मोठमोठे बॅनर्स देखील झळकले आहेत. अशारीतीने समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.