Home शैक्षणिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास २९ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास २९ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

15 second read
0
0
66

no images were found

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास २९ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर,  : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी नमूद कालावधीत शासनाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.

            12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी- 19 ते 29 सप्टेंबर 2025, अर्ज छाननी करावयाचा कालावधी- 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिध्द करणे-  6 ऑक्टोबर 2025, पहिली निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत- 16 ऑक्टोबर 2025, रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करणे- 17 ऑक्टोबर 2025 व दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2025 याप्रमाणे आहे.
         शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील. अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे श्रीमती नेर्लीकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…