
no images were found
तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का
कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे समीक्षण करणारे प्रसिद्ध समीक्षक कौशिक एलएम यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.