Home राजकीय ‘मोतीबाग’च्या अंगणात एमसीए विरोधात हेमंत पाटील यांचा एल्गार ,भ्रष्टाचार विरोधात चौकशी समिती नेमण्याची मागणी

‘मोतीबाग’च्या अंगणात एमसीए विरोधात हेमंत पाटील यांचा एल्गार ,भ्रष्टाचार विरोधात चौकशी समिती नेमण्याची मागणी

13 second read
0
0
16

no images were found

‘मोतीबाग’च्या अंगणात एमसीए विरोधात हेमंत पाटील यांचा एल्गार ,भ्रष्टाचार विरोधात चौकशी समिती नेमण्याची मागणी

 

पुणे, : -राज्याच्या क्रिडाविश्वात मानाचे स्थान असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) भ्रष्ट कारभाराविरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दंड थोपटलेआहे. असोसिएशनमधील भोंगळ कारभाराविरोधात वारंवार तक्रारी करून देखील योग्य कारवाई केली जात नसल्याने २९ एप्रिल पासून शरद पवार यांचे निवासस्थान ‘मोतीबाग’च्या अंगणातअसलेल्या एमसीएच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

        गत सहा दशकांपासून राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क एमसीएने बुडवला, असा थेट आरोप पाटील यांचा आहे. यासंदर्भात एमसीएने स्पष्टीकरण देण्याची गरज होती, मात्र आरोपांमध्ये तथ्यअसल्यानेच त्यांच्याकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नसल्याचा दावा पाटील यांनी केला.विशेष म्हणजे नोंदणी नसलेले क्लब एमसीएसोबत जोडण्यात आले आहेत. असोसिएशन सोबतजुळलेल्या जवळपास ६० पैकी केवळ २५ क्लबच नोंदणीकृत असल्याचा दावा पाटील यांनी केला.अनोंदणीकृत क्लबला एमसीएसोबत का आणि कुणाच्या आशिर्वादाने जोडण्यात आले? याचीचौकशी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यासोबतच वशिलेबाजीचा कळस गाठलेल्या महिला निवड समिती बरखास्त करीत नवीन समिती नेमण्याची मागणी देखील पाटील यांनी केलीआहे. वशिलेबाजी मुळे आतापर्यंत अनेक प्रतिभावंत महिला क्रिकेटर चे नुकसान झाले असल्याचा दावा पाटील यांनी केला.एमसीए चे अध्यक्ष रोहित पवार यांनी या सर्व आरोपांची दाखल घेतयोग्य कारवाई करणे अपेक्षित होते,मात्र तसे होतांना दिसत नसल्याने आंदोलन हाच एकमेव मार्ग शिल्लक असल्याचे पाटील म्हणाले. 

       पुण्यातील गव्हूंजे स्टेडियम समोरील जागेवर बेकायदेशीररित्या एमसीएने पार्किंग थाटली आहे. संबंधित जमीन सरकारची असतांना सर्रासपणे या जागेचा वापर अवैधरित्या केला जात आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये कोल्हापूर विभागातील पंधरा बाजार समित्या

स्मार्ट प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये कोल्हापूर वि…