
no images were found
वर्षभराची शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे १०० टक्के, तर टेमघर धरण ९३ टक्के भरले आहे. लवकरच टेमघर धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत जमा झाला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.