no images were found
एसटी महामंडळ पुन्हा एसी स्लीपर बस सुरु करणार
मुंबई : राज्य परिवहन महामंडळ पुन्हा एकदा एस सी स्लीपर सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. खासगी ट्रॅव्हल्सची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महामंडळ पुन्हा एकदा प्रयत्नात आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने हा प्रयोग राबविला होता. पण भाडे अधिक असल्याने प्रतिसाद कमी मिळाला. त्यानंतर महामंडळाने भाड्यात कपात करत प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात लालपरीला काही यश आले नाही. आता खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या एसी स्लीपर बस प्रवाशांच्या सेवेत सुरु करण्याच्यादृष्टीने हालचाल सुरु केली आहे. हैदराबाद येथे आयोजित देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या प्रदर्शनात विविध बसचीही पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा एसटीच्या ताफ्यात एसी स्लीपर बसचा समावेश करण्याची चर्चा सुरु झाली आहे.