Home सामाजिक गौरी-गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनात; ३०१ टेम्पो, ७ जेसीबी, ७ डंपर, २ क्रेनसह यंत्रणा सज्ज

गौरी-गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनात; ३०१ टेम्पो, ७ जेसीबी, ७ डंपर, २ क्रेनसह यंत्रणा सज्ज

1 min read
0
0
6

no images were found

गौरीगणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज अडीच हजारांहून अधिक कर्मचारी तैनात३०१ टेम्पो७ जेसीबी७ डंपर२ क्रेनसह यंत्रणा सज्ज

कोल्हापूर : घरगुती गौरीगणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉराजेंद्र भारुड यांनी दिल्याविसर्जनाचे कामकाज सुरळीतसुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात येत आहेतचारही विभागीय कार्यालयांच्या सहा.आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रात आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्याआयुक्त कार्यालयात आज दुपारी गौरीगणपती विसर्जनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आलायावेळी विसर्जनस्थळी आवश्यक मनुष्यबळवाहनेयंत्रसामग्रीविद्युत व्यवस्थास्वच्छताआरोग्य तयारीचा आढावा घेण्यात आलाशहरातील वारंटी कालावधीतील रस्त्यांवरील पॅचवर्कची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असूनमुख्य रस्त्यांवरील पॅचवर्कची कामे रात्रीच्या वेळेत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

इराणी खण येथे स्वयंचलित यंत्रणा

            इराणी खण येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी गुरुवारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात येणार आहेगणेशमूर्ती संकलन व विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने ३०१ टेम्पो१३०० हमाल७ जेसीबी७ डंपर८ ट्रॅक्टर४ पाण्याचे टँकर२ बूम५ रुग्णवाहिका५ साधे तराफे१० फ्लोटिंग तराफे आणि २ क्रेन अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहेविसर्जनस्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात करण्यात येणार आहेततसेच विद्युत विभागामार्फत विसर्जनस्थळी पुरेशा प्रमाणात मोठ्या लाईटची व्यवस्था करण्यात येत आहेविसर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येत आहेत.

१६० ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था

            पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नयेयासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये विविध ठिकाणी १६० गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात येत आहेही सर्व कुंडे शुक्रवारी रात्रीपर्यंत चारही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी बसवून त्यामध्ये पाणी भरण्यात येणार आहेपवडी विभागाच्या माध्यमातून नागरिकांनी कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती एकत्रित करून टेम्पोद्वारे वाहतूक करत इराणी खणीमध्ये विसर्जित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र पथके

            विसर्जनस्थळाजवळील निर्माल्य संकलनासाठी आरोग्य विभागाच्या वतीने २३ आरोग्य निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी चार कर्मचारी अशा दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेततसेच शहरातील १४ प्रमुख विसर्जनस्थळी प्रत्येकी १५ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तैनात करण्यात येणार आहेतसंकलित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती करण्यासाठी पुईखडीबापट कॅम्पकसबा बावडादुधाळी आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथे स्वतंत्र खड्डे तयार करण्यात येणार आहेतया ठिकाणी निर्माल्याचे विलगीकरण करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्यात येणार आहेया कामासाठी अवनीएकटीवसुंधरा तसेच इतर सेवाभावी संस्थांच्या सुमारे १५० महिला सदस्यांचा सहभाग राहणार आहे.

            गौरीगणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करावेमहापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्येच गणेशमूर्तीचे विसर्जन तसेच निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य जमा करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉराजेंद्र भारुड यांनी केले आहे.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, डॉ.विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहा.अभियंता अमित दळवी आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम: जिल्ह्यातील सा…