Home शैक्षणिक ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेत असीम निरंकारी, अथर्व पाटील प्रथम

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेत असीम निरंकारी, अथर्व पाटील प्रथम

2 second read
0
0
22

no images were found

‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेत असीम निरंकारी, अथर्व पाटील प्रथम-डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग, साळोखेनगरच्यावतीने आयोजन-बारावी विज्ञान शाखेतील २८०० विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

साळोखेनगर (प्रतिनिधी):-डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगरच्या वतीने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सतेज मॅथ्स’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत असीम निरंकारी आणि अथर्व पाटील यांनी प्रथम क्रमांक (विभागून) पटकावला.

अभियांत्रिकी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी गणित विषयाचे महत्व जाणून घेऊन आणि तार्किक विचारशक्ती विकसित करण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगरच्यावतीने गेल्या दहा वर्षापासून ‘सतेज मॅथ्स’ परीक्षेचे आयोजन केले जाते. यावर्षी जिल्ह्यातील २,८०० विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती.

या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार नामांकित करण्यात आले. यामध्ये असीम निरंकारी आणि अथर्व पाटील प्रथम क्रमांक (विभागून) प्राप्त केला. तर श्रेयश पाटील आणि श्री किल्लेदार (विभागून) द्वितीय क्रमांक आणि अवधूत पाटील आणि साक्षी वाईंगडे यांनी (विभागून) तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याना अनुक्रमे पंचवीस हजार, पंधरा हजार आणि दहा हजार व सन्मान चिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा. सुयोग पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

संस्थेचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात गणित हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाचा महत्त्वाचा पाया आहे. गणितातील संकल्पना जितक्या स्पष्ट असतील तितका विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि उच्च शिक्षणातील विविध संधी खुल्या होतात. ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण करून त्यांना अभियांत्रिकी आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनविणारा एक प्रभावी उपक्रम आहे. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यास दिशा मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डीवायपी साळोखेनगरचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, अशा स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अभियांत्रिकीसाठीचा गणितीय पाया भक्कम करण्यासाठी ही परीक्षा महत्वाची भूमिका पार पाडते.
सूत्रसंचालन प्रा. वनश्री शिंदे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी आपल्या घरांना अपूरणीय बनवणाऱ्या अनमोल आठवणी शेअर केल्या

पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी आपल्या घरांना अपूरणीय बनवणाऱ्या अनमोल आठवणी शेअर केल्या &n…