Home मनोरंजन कलाकारांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन प्रवासाला खास बनवणाऱ्या नात्यांचा उत्सव साजरा केला

कलाकारांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन प्रवासाला खास बनवणाऱ्या नात्यांचा उत्सव साजरा केला

10 second read
0
0
4

no images were found

कलाकारांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन प्रवासाला खास बनवणाऱ्या नात्यांचा उत्सव साजरा केला

 मुंबई, : टेलिव्हिजन शोमध्ये एकत्र काम करताना कलाकार अनेकदा एकमेकांच्या जवळ येतात, पण कधी कधी त्यांच्यात निर्माण होणारं नातं हे केवळ सहकलाकारांपुरतं मर्यादित राहत नाही. सेटवर दीर्घकाळ एकत्र वेळ घालवणं, व्यस्त वेळापत्रक सांभाळणं, दैनंदिन क्षण एकत्र अनुभवणं आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, यामुळे व्यावसायिक नात्याचं रूपांतर कुटुंबासारख्या आपुलकीच्या नात्यात होऊ शकतं. यंदाच्या भाऊबीजेनिमित्त, सोनी सबचे कलाकार मुकुल हरीश, अक्षया हिंदाळकर आणि उर्वा सवालिया यांनी आपल्या सहकलाकारांमध्ये भावंडं कशी सापडली आणि सेटवर सुरू झालेलं नातं ऑफ-स्क्रीनही एका जिव्हाळ्याच्या नात्यात कसं बदललं, याबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं.

 

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये टायगरची भूमिका साकारणाऱ्या मुकुल हरीश यांनी सांगितले, “या शोमध्ये विश्वाची भूमिका साकारणारी जिया आणि मी पहिल्या दिवसापासून कदाचित सर्वाधिक वेळ एकत्र स्क्रीन शेअर केला आहे. माझ्या पात्राप्रमाणेच मी ऑफ-स्क्रीनही तिला ‘शानी’ असंच म्हणतो. आम्ही दोघेही जवळपास एकाच वेळी या शोमध्ये सामील झालो आणि आमच्यात लगेचच एक सुंदर नातं निर्माण झालं. मला वाटतं, आम्ही दोघेही अहमदाबादचे असल्यामुळे सुरुवातीपासूनच आमच्यात एक समान धागाही होता. कालांतराने आम्ही एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल झालो आहोत आणि आमचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं आहे. सेटवर ती मला धाकट्या बहिणीसारखी वाटते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत इतका कम्फर्ट असतो, तेव्हा तिच्यासोबत शूटिंग करणं हे काम वाटतच नाही.”

     पुष्पा इम्पॉसिबलमध्ये राशीची भूमिका साकारणाऱ्या अक्षया हिंदाळकर यांनी सांगितले, “नितीन आणि समृद्ध यांच्यासोबत माझं खूप खास नातं आहे. ते या प्रवासाचा खूप काळापासून भाग आहेत. वर्षानुवर्षे आम्ही एकमेकांसोबत इतके कम्फर्टेबल झालो आहोत की ते खरोखरच माझ्या कुटुंबाचाच भाग असल्यासारखे वाटतात. ते माझ्यासाठी भावांसारखे आहेत. ते नेहमी माझी काळजी घेतात, माझी फिरकी घेतात आणि सेटवर एकही क्षण कंटाळवाणा होऊ देत नाहीत. नुकताच आमच्यात सामील झालेल्या मुकुलसोबतही ओळख वाढवत त्याच प्रकारचं मैत्रीपूर्ण नातं तयार करणं खूप छान वाटत आहे. आम्ही शॉट्सदरम्यानचे छोटे-छोटे क्षण एकमेकांसोबत शेअर करतो आणि एकमेकांना साथ देतो. मला कधीच असं वाटत नाही की मी फक्त माझ्या सहकलाकारांमध्ये आहे, कारण ते खरोखरच कुटुंबासारखे वाटतात. ते मला इतकं प्रेम, सुरक्षितता आणि आपुलकीची भावना देतात की ते माझ्या आयुष्यात आहेत यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. आम्ही रक्ताचे भाऊ-बहीण नसू, पण आमच्यातील नातं तितकंच अर्थपूर्ण आणि खास आहे.”

     हस्तिनापूर के वीरमध्ये अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या उर्वा सवालिया यांनी सांगितले, “श्रेया पटेल आणि माझ्यात खूप मजेशीर नातं आहे. आम्ही इतके चांगले मित्र झालो आहोत की पूर्ण दिवसाचं शूटिंग संपल्यानंतरही आम्ही अनेकदा आणखी वेळ एकत्र घालवतो. आम्ही तासन्तास गप्पा मारू शकतो, हसू शकतो, मस्करी करू शकतो आणि तरीही एकमेकांचा कंटाळा येत नाही! ती माझ्यासाठी बहिणीसारखी आहे. मी कम्फर्टेबल आहे की नाही आणि मला सगळ्यांमध्ये सामावून घेतलं जातंय ना, याची ती नेहमी काळजी घेते. सेटवर आम्ही इतका वेळ एकत्र घालवत असल्यामुळे आमचं नातं खूप खास बनलं आहे. या भाऊबीजेला श्रेयाच्या रूपाने मला एक बहीण मिळाली आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. जरी आम्ही खऱ्या आयुष्यात भाऊ-बहीण नसलो, तरी ती मला इथे सेटवरच कुटुंब असल्याची जाणीव करून देते. हे नातं असंच कायम राहावं आणि आम्ही एकत्र आणखी खूप सुंदर आठवणी निर्माण कराव्यात, अशी माझी आशा आहे!”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

पाच लाख रुपयांची वैयक्तिक भेट नाकारून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचा गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात; दोन आठवड्यांत सात ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

पाच लाख रुपयांची वैयक्तिक भेट नाकारून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचा गरजू रुग्णांसाठी मदतीचा हा…