Home क्राईम बहिणीला छेडल्याने भावाने दिली भलत्याला शिक्षा

बहिणीला छेडल्याने भावाने दिली भलत्याला शिक्षा

0 second read
0
0
26

no images were found

बहिणीला छेडल्याने भावाने दिली भलत्याला शिक्षा

ठाणे : बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेल्या भावाने भलत्याच तरुणाला मारहाण केली. इतकंच नव्हे तर भावाने चाकूने तरुणाच्या हातावर देखील हल्ला केला. परंतु हा तरुण आपल्या बहिणीला छेडणारा नसल्याचं माहिती पडताच या हल्लेखोर भावाने तिथून पळ काढला. ही घटना ४ जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास डोंबिवलीतील सागर्ली परिसरात घडली. विठ्ठल भालेकर असं जखमी तरुणाचं नाव आहे. तर पवन पाटील असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे.
डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली परिसरात ४ जानेवारीला सुमारास एका तरुणीची अज्ञात इसमाने छेड काढली. या तरुणीने ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेला भाऊ पवन पाटील यान सागर्ली परिसरात या तरुणाचा शोध सुरु केला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भालेकर हा तरुण सागर्ली परिसरातून जात होता. याच दरम्यान पवन पाटील याने त्याला गाठले. बहिणीने केलेल्या वर्णनावरुन त्याला संशय आल्याने काहीच विचारपूस न करता त्याने थेट विठ्ठल याला बेदम मारहाण केली. विठ्ठल पवनला का मारहाण करतोयस याबाबत विचारत होता. मात्र, पवनने काही ऐकता विठ्ठलला मारहाण सुरूच ठेवली. इतकंच नव्हे तर संतापाच्या भरात पवन पाटीलने आपल्या जवळील चाकू काढून विठ्ठलवर हाताला गंभीर दुखापत झाली. विठ्ठलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…