
no images were found
शाहू स्टेडियमवर उद्यापासून संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा
कोल्हापूर : श्रीमंत शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून ७६ व्या संतोष ट्रॉफीच्या ग्रुप चारमधील लिग सामने कोल्हापूरात प्रथमच होणार आहेत. शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर शनिवार दि.७ जानेवारी पासून स्पर्धेस सुरुवात होणार आहे.१५ पर्यंत सामने खेळविण्यात येणार आहेत भारतातील दिग्गज राज्य संघाचा खेळ पाहण्याची संधी फुटबॉल शौकिनांना मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन ७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पेट्रन्मेंबर युवराज संभाजीराजे छत्रपती, कायर्र्कारिणी सदस्य, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, न्यू दिल्ली, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांची उपस्थिती असणार आहे.
यजमान महाराष्ट्र पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिव दमन व दादरा, हरियाणा या संघांचा स्पर्धेत समावेश आहे. यापूर्वी अनेक वर्षे संतोष ट्रॉफीचे सामने सर्वच राज्यांच्या सहभागाने एकाच ठिकाणी होत होते. त्याऐवजी ईस्ट झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन, वेस्ट झोन व सेंट्रल झोन या पाच विभागात सूरू केली आहे. भारतातील राज्यांच्या संघांची एकूण सहा गटात प्रत्येकी सहा संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील सर्व संघ शुक्रवारी कोल्हापुरात येणार असून अ संघांना सराव करणेसाठी पोलो ग्राऊंड उपलब्ध करणेत आलेले आहे. संतोष ट्रॉफी स्पर्धेच्या निमित्ताने चांगल्या खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी कोल्हापूरातील खेळाडूंना व फुटबॉल शौकिनांना मिळणार आहे.