
no images were found
सांगली येथे श्री राम कथेतील श्रीराम जन्मोत्सव सोहळा
सांगली ( रेखा दामुगडे) : सांगली मधील नेमिनाथ नगर येथे आयोध्या नगरीत श्री राम कथा व संकीर्तन समिती सांगली यांच्या मार्फत दि.4 पासून दि.14 तारखे पर्यंत आयोजित श्रीराम कथा, प्रवचन, किर्तन कार्यक्रम, महाप्रसाद आयोजीत करण्यात आला आहेत.आज राम कथेचा तिसरा दिवस आज जन्मोत्सव, हरिपाठ ,कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन आहे. आज श्री राम कथेस प्रारंभ करण्यापूर्वी संजयजी डोडीया, राजेंद्रजी मर्दा, सारडा परिवार, पंडितराव पाटील, विजयराव गवळी यांच्या हस्ते परम पूज्यजी श्री समाधान महाराज शर्मा यांना माल्या अर्पण करण्यात आले.रोज सात ते आठ हजार भक्तांची उपस्थितीत कथा, हरिपाठ , किर्तन पार पडते. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे कार्यक्रम सुरु असतात. यात आरोग्य शिबिर, पारायण, हरिपाठ असा नित्य दिनक्रम रोज असतो.
उदया दि.7 रोजी श्रीराम कथेचा चौथा दिवस असून श्री राम विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. असे आयोजक मनोजजी सारडा यांनी सांगितले.