Home Uncategorized सर्वसमावेशक दुष्काळ निवारण आराखडा तयार करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

सर्वसमावेशक दुष्काळ निवारण आराखडा तयार करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

11 second read
0
0
7

no images were found

सर्वसमावेशक दुष्काळ निवारण आराखडा तयार करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 ग्राम दुष्काळ निवारण आराखडा तयार करण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

 कोल्हापूर,  : राज्य शासनाच्या सूचनांनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांमधील प्रत्येक गावासाठी ग्राम दुष्काळ निवारण आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.

    बैठकीस निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हाधिकारी रोहयो शक्ती कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उगले, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती देवकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाबर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

        बैठकीमध्ये राज्य शासनामार्फत ग्राम दुष्काळ निवारण आराखडा तयार करण्यासाठी  उपलब्ध करून देण्यात आलेल्या आराखड्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादरीकरण करण्यात आले. गावपातळीवर दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक गावातील परिस्थिती व आवश्यक उपाययोजनांचा विचार करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

       या बैठकीत कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, रोजगार हमी योजना विभाग, जलसंधारण विभाग, मृद व जलसंधारण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याशी संबंधित गावपातळीवरील आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. दुष्काळ निवारणासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करून आराखड्यात सर्व संबंधित घटकांचा समावेश करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

     तसेच उपस्थित सर्व विभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांबाबत मते व सूचना मांडाव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेप

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेप  *गतवर्षाच्या तुलने…