
no images were found
साताऱ्यातील तरुण कुल्लू-मनालीमध्ये पॅराग्लायडिंग करताना शेकडो फुटांवरुन पडल्याने जागीच ठार
सातारा : साताऱ्यातील एका तरुण पर्यटकाचा कुल्लू जिल्ह्यामध्ये पॅराग्लायडींग करताना दुर्देवी अंत झाला आहे. येथील दोभी परिसरामध्ये पॅराग्लायडींग करताना शनिवारी झालेल्या दुर्देवी अपघातात या पर्यटकाने प्राण गमावला. हा तरुण पर्यटक शेकडो फूट उंचीवरुन खाली पडला.
पॅराग्लायडींग करताना हार्नेसमध्ये (दोरी) गडबड झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याबरोबर असलेला पॅराग्लायडर सुरक्षित आहे. मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव सुरज संजय शाह असं आहे. ३० वर्षांचा सुरज हा साताऱ्यातील शिवरळ गावातील रहिवाशी होता. तो त्याच्या मित्रांबरोबर मनाली फिरायला गेला होता. या प्रकरणामध्ये कूल्लूचे पोलीस अधिक्षक गुरुदेव शर्मा यांनी रविवारी या अपघातासंदर्भात पोलीस स्थानकात माहिती मिळाल्याचं सांगितलं. “पॅराग्लायडर सुरक्षित असून पर्यटकाचा मात्र जागीच मृत्यू झाला आहे. या बाबत गुन्हा दाखल करण्यात आहे,” असे पोलीस अधिकक्षकांनी सांगितलं.