
no images were found
कदमवाडीत भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याने शिक्षक गंभीर जखमी
कोल्हापूर : शहरातील कदमवाडीत भरदिवसा शिक्षकाला शाळेतून बोलवून कोयत्याने हल्ला करण्यात आला.जखमी शिक्षकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांच्यावर कदमवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
कदमवाडी परिसरातील संस्कार शिक्षण मंडळाच्या सुसंस्कार हायस्कूलमधील शिक्षक संजय सुतार यांच्यावर शाळेच्या आवारातच अज्ञातांनी हल्ला केला. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कदमवाडी चौकात शाळेतून बोलावून शिक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. शिक्षक संजय कृष्णा सुतार (रा. वरणगे-पाडळी ) यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
लहान भावाला शिक्षकाने ओरडल्याने मोठ्या भावाने शिक्षकावर कोयत्याने हल्ला केला. मानेवर पोटात, छातीवर, पाठीवर असे अंदाजे कोयत्याने आठ वार केले. हल्ल्याचे वृत्त समजताच शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन चौघांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे. अधिक तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत.