
no images were found
‘त्या ‘ किसिंग सीनआधी खूपच घाबरलेले इरफान खान;दिव्या दत्ता
मुंबई: अभिनेत्री दिव्या दत्ता आणि दिवंगत अभिनेते इरफान खान बॉलिवूडच्या उत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. या दोघांनी एकत्र दोन सिनेमात काम केले आहे. एका सिनेमात चक्क दिव्याने इरफान यांना सुनावले होते. तर दुसऱ्या सिनेमात या दोन कलाकारांचा किसिंग सीन होता आणि तो करण्यापूर्वी अभिनेत्याची अवस्था खूपच बिकट झाली होती.
दिव्याने अलीकडेच दिलेल्या मुखाखतीमध्ये इरफानविषयी भाष्य केले. इरफान यांनी दिव्या यांनी एकत्र केलेला पहिला सिनेमा म्हणजे ‘दुबई रिटर्न’. दिव्याच्या मते, जेव्हा तिने इरफान यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचा खट्याळपणा दिसला होता. अभिनेत्री ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.
दिव्या दत्ताने त्या सीनबद्दल सांगितले, जेव्ही तिने इरफानला फटकारले होते. दिग्दर्शकाने कट म्हटल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि इरफान खान यांनीही कौतुक केले. सीननुसार, पाणी पिल्यानंतर इरफानला तो ग्लास दिव्याला परत करायचा होता आणि त्यानंतर घरातून निघून जायचे नव्हते. मात्र सीन करताना इरफान यांनी ग्लास परत केला नाही, त्यामुळे दिव्या गोंधळली. तिने तो ग्लास त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो ग्लास घट्ट पकडून ठेवलेला. याचा परिणाम असा झाला की दिव्या दत्ता त्यांच्यावर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये ओरडली आणि सीन संपला. दिग्दर्शकाने कट म्हणताच संपूर्ण टीमने टाळ्या वाजवल्या आणि इरफान यांनी दिव्याला अशी प्रतिक्रिया दिली की, ‘तुझ्यात काहीतरी खास आहे.’
त्यानंतर दिव्या दत्ताने ‘हिस्स’ सिनेमाबद्दल सांगितवे. ज्यामध्ये किसिंग सीनपूर्वी इरफान खान यांची अवस्था वाईट झाली होती. ते घाबरले आणि टेरेसवर जाऊन बसलेले. दिव्याने असे म्हटले की, “हिस्समध्ये आमच्या दोघांचा एक किसिंग सीन होता. त्यांचा स्वभाव लाजाळू होता. मी माझ्या दिग्दर्शकाला विचारले की इरफान कुठे आहेत, ते म्हणाले की ते टेरेसवर आहेत. प्रथमच त्यांना पाहून मला एवढा आनंद झालेला, कारण ते घाबरले होते