
no images were found
महानगरपलिका क्षयरोग निर्मुलनासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव
कोल्हापूर (प्रतिनिधी): -राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत अत्याधुनिक उपचार प्रणाली बाबतचे व दि.10 ते 22 मार्च 2025 या कालावधीमध्ये टीबी रुग्ण शोध मोहिमेचे प्रशिक्षण आज सावित्रीबाई फुले रुग्णालयात आयोजीत करण्यात आले होते. यावेळी सन 2024 साली क्षयरोग रुग्ण शोध कामकाजाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने उत्कृष्ट कामकाज केलेल्या महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व वॉर्ड दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचा आज उप-आयुक्त पंडित पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी क्षयरोग जागतिक आरोग्य संघटना सल्लगार डॉ.चेतन हांडे व आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नोडल ऑफिसर डॉ.अमोल माने व क्षयरोग नियंत्रण सोसायटी कडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यामध्ये शासन मार्गदर्शक सुचनेनुसार ठरवून दिलेल्या क्षयरोग रुग्ण शोध कामकाजच्या उद्दिाष्टानुसार प्रथम क्रमांक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.4, व्दितीय क्रमांक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.7 व तृतीय क्रमांक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.11 यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रथम क्रमांक महात्मा जोतिबा फुले वॉर्ड दवाखाना, व्दितीय क्रमांक लक्ष्मी टेक वॉर्ड दवाखाना व तृतीय क्रमांक बॉरिस्टर खर्डेकर वॉर्ड दवाखाना यांचाही सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अमरसिंह पोवार यांनी मानले.
उप-आयुक्त पंडित पाटील यांनी या गौरव सोहळ्यमध्ये ज्या आरोग्य संस्था आणि वैद्यकीय अधिकारी यांचा गौरव करण्यात आला त्यांना शुभेच्छा देऊन या पुढे देखील कामकाजामध्ये सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराच्या फैलावाचा सामाना करत असताना सर्व आरोग्य संस्थांनी सहजपणे काम केलेस क्षयरोग मुक्त कोल्हापूरचे उद्दिष्ट साध्य करता येत असल्याचे सांगितले. त्या दृष्टीने सर्वांनी नियोजनात्मक कामकाज करुन राष्ट्रीय कार्यक्रमास हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले. क्षयरोग जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ.चेतन हांडे यांनी राज्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग विभागाचे कामकाज उल्लेखनिय आहे. त्या बद्दल सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचे विशेष अभिनंदन केले