
no images were found
पांजरपोळ मेनरोड परिसरातील वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडयांवर कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी):-:महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ई वॉर्ड पांजरपोळ मेनरोड परिसरात मंगळवारी सकाळी 10 ते 2 च्या सुमारास अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मेनरोड वरील स्क्रॅप, दीर्घकाळ बंद अवस्थेत असणा-या व वाहतूकीस अडथळा करणाऱ्या 38 चारचाकी गाडया काढण्याची कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभाग व शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्यामार्फत संयुक्त करण्यात आली. सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिक्रमण अधिक्षक विलास साळोखे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी नंदकुमार मोरे, महापालिका व पोलीस कर्मचा-यांमार्फत करण्यात आली.
शहरामध्ये विविध ठिकाणी स्क्रॅप चार चाकी गाड्या, दीर्घकाळ बंद अवस्थेत उभ्या असणा-या व वाहतुकीस अडथळा ठरणा-या फोर व्हिलर यांच्यावर शहर वाहतूक शाखा व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपली बंद अवस्थेतील वाहणे रहदारीस अडथळा होईल अशी रस्तेवरती पार्कींग करू नये अन्यथा त्या वाहनांवर कारवाई केली जाईल असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.