Home आरोग्य विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

0 second read
0
0
9

no images were found

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कोल्हापूर / प्रतिनिधी: गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी, ६ मार्च २०२५ रोजी, सायंकाळी ४:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या नव्या इमारतीत २२० सर्व सोयींनीयुक्त बेड्स असलेले अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. येथे आंतररुग्ण चिकित्सा,क्रिटिकल केअर, अॅडव्हान्स अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर, इमर्जन्सी मेडिसिन ट्रामा, हृदयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया, त्वचारोग, प्लास्टिक, एस्थेटिक आणि पुनर्रचना शस्त्रक्रिया,एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जरी, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, न्यूरोसर्जरी, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, किडनी विकार, मूत्र विकार, प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, बालरोग, कॅन्सरसह जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अशा विविध विभागांसह तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता असणार आहे. एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवणारे हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे. अशी माहिती विन्स हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू आणि डॉ. सुजाता प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या रुग्णालयाचे व्यवस्थापन डॉ.व्यकंट होळसंबरे  (ग्रुप सीईओ), श्री. संदीप वनमाळी (सीईओ) आणि त्यांच्या टीमकडे सोपवण्यात आले आहे. या टीमला भारतातील प्रसिद्ध कॉर्पोरेट रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचा सुमारे २६ वर्षांचा अनुभव आहे.

डॉ.प्रभू पुढे म्हणाले , ६ मार्च रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभात तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आ. अमल महाडिक, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. अशोकराव माने, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. राहुल आवाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

कोल्हापूरात उभारण्यात आलेल्या या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी, निदान आणि अत्याधुनिक उपचारांसह एआय टेलिमेडिसीन व भविष्यकाळात रोबोटिक शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यांसारख्या आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विन्स हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात हे एक पुढचे पाऊल उचलले असून, पश्चिम महाराष्ष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

पत्रकार परिषदेस न्यूरोसर्जन डॉ. आकाश प्रभू, डॉ. डीओना प्रभू,डॉ. संदीप पाटील, व्यंकट होळसंबे, संदीप वनमाळी, चिन्मय ठक्कर, दामोदर घोलकर ,आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर &nb…