no images were found
एण्ड टीव्ही कलाकार सांगत आहेत त्यांच्या रोजच्या सुपरफूडबाबत!
आज आरोग्यदायी राहण्यासाठी स्मार्टपणे फूड निवड केले जाते आणि कलाकारांना योग्य संतुलन कसे राखावे हे चांगलेच माहित आहे. अॅव्होकॅडो, क्विनोआ आणि चिया बिया यांसारख्या जागतिक सुपरफूड्सची मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते, पण भारतात स्वत:चे खास व उत्तम खाद्यपदार्थ आहेत, जे तितकेच पोषण देतात. संपूर्ण धान्यांपासून रोगप्रतिकारशकती वाढवणाऱ्या घटकांपर्यंत हे देशी सुपरफूड्स साध्या, पण गुणकारी पद्धतीने त्यांच्या जीवनाचा भाग आहेत. एण्ड टीव्ही कलाकार प्रियमवदा कांत (लतिका, ‘घरवाली पेडवाली’), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि आसिफ शेख (विभुती मिश्रा, ‘भाबीजी घर पर है’) त्यांच्या नित्यक्रमामध्ये या समकालीन खाद्यपदार्थांचा कशाप्रकारे समावेश करतात आणि ते त्यांचे ताकद व ऊर्जेचे पसंतीचे स्रोत का आहेत याबाबत सांगत आहेत. आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली’मधील प्रियमवदा कांत ऊर्फ लतिका म्हणाल्या, “माझा ठाम विश्वास आहे की, आपले भारतीय किचन पोषणाचा खजिना आहे. मला स्वत:ला माझ्या आहारामध्ये मोरिंगा आणि रागीचा समावेश करायला खूप आवडते. मोरिंगा पानांमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असतात आणि रागी कॅल्शियम व प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. मी क्विनोआ किंवा चिया सारख्या जागतिक सुपरफूड्सचा देखील वापर करते, पण मला वाटते की आपला रागी डोसा किंवा मोरिंगा पराठा परंपरेची आठवण करून देण्यासोबत तीच पौष्टिकता देतात. हे खाद्यपदार्थ आरोग्यदायी असण्यासोबत आपल्या संस्कृतीचा भाग देखील आहेत आणि ते मला फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासह माझ्या मुळाशी संलग्न राहण्यास मदत करतात.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, “माझे आवडते देशी सुपरफूड म्हणजे सत्तू (भाजलेले बेसन). ते साधे असले तरी पोट भरल्याचे समाधान देते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, ज्यामुळे ते दीर्घकाळ शूट केल्यानंतर परिपूर्ण पेय आहे. मी उन्हाळ्यात या पेयाचा आस्वाद घेत मोठा झालो आहे आणि आता ते माझ्या नित्यक्रमाचा भाग बनले आहे. पाण्याने भरलेले सत्तू असो किंवा ताक असो, आरोग्यदायी सत्तू पराठा असो किंवा घरी बनवलेले लिट्टी असो त्यामधून मला नेहमी ऊर्जा मिळते. हे तेच खाद्यपदार्थ आहे, ज्यांनी आपल्या आजी-आजोबांना प्रबळ व सक्रिय ठेवले, ते आजही तितकेच गुणकारी आहेत आणि परवडणारे, नैसर्गिक आहेत, तसेच प्रत्येक आस्वादामधून पौष्टिकतेची खात्री मिळते.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील आसिफ शेख ऊर्फ विभुती मिश्रा म्हणाले, “वर्षानुवर्षे मला जाणवले आहे की, साध्या गोष्टी अनेकदा आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरतात. आवळा, हळद आणि तूप हे माझे आवडते खाद्यपदार्थ आहेत. मी सकाळी आवळ्याचा रस पितो, ज्यामधून मला खूप ऊर्जा मिळते, हळदीचे दूध रोगप्रतिकारशक्तीठी माझे आवडते पेय आहे आणि चपातीवर थोडेसे तूप कोणत्याही जेवणाला पौष्टिक बनवते. तसेच, मी जागतिक सुपरफूड्सचा देखील आस्वाद घेतो, जसे माझ्या सॅलडमध्ये कधी-कधी अॅव्हाकॅडोचा समावेश करतो. पण मला खरोखर वाटते की, आपले भारतीय मुख्य खाद्यपदार्थ कालातीत आहेत.”