Home मनोरंजन हिम्मत के समुंदर की, है ये ‘कहानी हर घर की’ – जुही परमारसोबत फक्त झी टीव्हीवर!

हिम्मत के समुंदर की, है ये ‘कहानी हर घर की’ – जुही परमारसोबत फक्त झी टीव्हीवर!

2 second read
0
0
73

no images were found

हिम्मत के समुंदर की, है ये ‘कहानी हर घर की’ – जुही परमारसोबत फक्त झी टीव्हीवर!

 जिथे महिलांनी भावनिक दुर्लक्ष सहन केले आहे, कुटुंबासाठी तडजोडी केल्या आहेत, आपल्या स्वप्नांना थांबवून ठेवलेले आहे, आणि अशी ताकद दाखवलेली आहे जिच्याकडे अनेकदा कोणाचे लक्षच जात नाही. या वास्तवाने देशभरातील असंख्य महिलांचे जीवन घडवले आहे पण या गोष्टी क्वचितच समाजासमोर येतात.

हीच ती शांतता आहे जी आता मोडून टाकण्याच्या दिशेने झी टीव्ही पावले टाकत आहे. ‘आपका अपना झी’ या नव्या ब्रँड ओळखीच्या माध्यमातून झी टीव्ही प्रेक्षकांशी आपले नाते आणखी दृढ करत आहे — असे नाते जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नाही, तर अशा मुद्द्यांवर प्रकाश टाकते जे खरंच महत्त्वाचे आहेत. या विचाराला पुढे नेत झी टीव्ही सादर करत आहे एक वेगळ्या वाटेचा, मनाला भिडणारा नवा रिअॅलिटी फॉरमॅट – ‘कहानी हर घर की’. जुही परमार यांच्या सूत्रसंचालनाखाली हा शो भारतभरातील महिलांना त्यांच्या जीवनातील सत्य कथा मांडण्यासाठी एक सुरक्षित आणि सन्मानजनक व्यासपीठ देतो. झी स्टुडिओज निर्मित, ‘कहानी हर घर की’ प्रीमियर होणार आहे 1 सप्टेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता फक्त झी टीव्हीवर!

गेल्या अनेक वर्षांमध्ये जुही परमारने आपल्या आपलाशा वाटणाऱ्या अभिनयाने आणि प्रेरणादायक भूमिकांमुळे प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम मिळवले आहे. या नव्या फॉरमॅटसह, ती केवळ एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नाही तर “आपली जुही” म्हणून परत येतेय – एक ऐकून घेणारी, मार्गदर्शक आणि सहानुभूतीपूर्ण सखी, जी असा एक सुरक्षित अवकाश निर्माण करते जिथे महिलांना ऐकले जाण्याचे, समजून घेतले जाण्याचे आणि साथ मिळण्याचे खरे समाधान मिळते.

“कहानी हर घर की” हा कार्यक्रम प्रत्येक भागात एका खऱ्या स्त्रीचा अतिशय वैयक्तिक प्रवास उलगडून दाखवेल. त्यात भावनिक उपेक्षा, कौटुंबिक दडपण, नातेसंबंधातील संघर्ष आणि करिअरसाठी कराव्या लागणाऱ्या त्यागांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला जाईल. स्पष्ट संवादांद्वारे आणि मानसशास्त्रज्ञ तसेच खास पाहुण्यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम रूढी मोडण्याचा, सहानुभूती निर्माण करण्याचा आणि प्रेक्षकांना आपल्या घरातील दडलेल्या वास्तवांवर विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करेल.

कार्यक्रमाच्या संवेदनशीलतेचे प्रतिबिंब दाखवण्यासाठी एक समर्पक अनुभव म्हणून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना हेडफोन देण्यात आले आणि त्यांना मालिकेतून घेतलेल्या एका कथेचे ध्वनीमाध्यमातून सादरीकरण ऐकवण्यात आले. दृश्यांशिवाय आणि केवळ निवेदनाच्या मार्गदर्शनाने त्या कथेतील एका वास्तविक संघर्षाच्या दोन्ही बाजू उलगडत गेल्या आणि ती कथा एका तणावपूर्ण, अनिर्णित क्षणी थांबली. जशी उत्सुकता शिगेला पोहोचली तेव्हाच जूही परमार मंचावर आल्या आणि या अद्याप न ऐकलेल्या स्त्रियांच्या आवाजांना आज पुढे येऊन मान्यता मिळणे का आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले.

“कथाकथनकार म्हणून आम्हाला वाटते की सर्वात प्रभावी कथा त्या असतात ज्या सत्यावर आधारलेल्या असतात. ‘कहानी हर घर की’ हा फक्त आणखी एक नॉन-फिक्शन फॉरमॅट नाही; तर हा महिलांच्या खऱ्या अनुभवांना संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे समोर आणण्याचा एक प्रयत्न आहे. हा शो आमच्या दृष्टीकोनाशी जुळणारा आहे, जो महत्त्वाच्या चर्चांना चालना देतो आणि असे फॉरमॅट्स निर्माण करतो जे भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवणारे आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुसंगत, तसेच देशभरातील घरांमध्ये संवादाला प्रोत्साहन देणारे आहेत.”

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर राघवेंद्र हुंसूर म्हणाले, “प्रत्येक माणसाच्या संघर्षांच्या, न बोललेल्या वेदनांच्या, शांतपणे लढलेल्या लढायांच्या तसेच जिद्दीच्या, धैर्याच्या आणि आशेच्या कथा असतात. ‘कहानी हर घर की’ हा केवळ एक शो नाही, तर तो आधार देणारा खांदा आहे, ऐकून घेणारा मित्र आहे आणि जिथे न ऐकलेल्या आवाजांना सहानुभूती मिळते अशी एक जागा आहे. नातेसंबंध, करिअर आणि समाजात झुंज देणाऱ्या महिलांपासून, शांतपणे यश मिळवलेल्या अनाम वीरांपर्यंत—आम्ही त्यांच्या सत्यकथा प्रकाशात आणतो. या व्यासपीठाद्वारे आम्हांला प्रत्येक प्रेक्षकाला हे स्मरण करून द्यायचे आहे की प्रवास कितीही कठीण असो, पुढे जाण्याचा मार्ग नेहमी असतो. हा कार्यक्रम म्हणजे ऐकून घेण्याचा, समजून घेण्याचा आणि जगण्याची ताकद व जिद्द साजरी करण्याचा आमचा प्रयत्न आणि आमच्याकडून प्रेक्षकांसाठी भेट आहे.”

झी टीव्हीचे चीफ चॅनल ऑफिसर मंगेश कुलकर्णी म्हणाले, “झी टीव्हीमध्ये आमचा प्रयत्न नेहमीच उद्देशपूर्ण आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे, वास्तवाशी जोडलेले कंटेंट सादर करण्याचा राहिला आहे. ‘कहानी हर घर की’च्या सुरुवातीसोबत भारतीय घरांमध्ये अनेकदा न बोलल्या जाणाऱ्या संवादांना वाचा फोडण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत. हा कार्यक्रम अर्ली प्राइम टाइमला सुरू होत असून यातून खरे लोक आणि खऱ्या भावना दाखवून आम्ही प्रेक्षकांशी अधिक गहिरे भावनिक नाते जोडण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी एकरुप आहोत. रोजच्या जीवनातील खऱ्या समस्यांवर प्रकाश टाकून आणि लोकांना आपले सत्य शेअर करण्यासाठी सक्षम बनवून, हा शो संवादासाठी एक व्यासपीठ तयार करतो. जुही परमार यांच्या संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचा फॉर्मेट देशभरातील प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल असा आम्हाला विश्वास आहे.”

जूही परमार म्हणाल्या, “या अनेक वर्षांत मी अशा कितीतरी भूमिका केल्या आहेत ज्यांनी भारतीय महिलांच्या मनात खोलवर ठसा उमटवला, पण ‘कहानी हर घर की’ माझ्यासाठी खास आहे, कारण यातून मला खऱ्या कथा आणि खऱ्या भावना अधिक जवळून आणि वैयक्तिक पातळीवर जाणून घेण्याची संधी मिळते. कधी कधी स्त्रीला फक्त एवढंच हवं असतं—एक सुरक्षित व्यासपीठ जिथे ती आपलं सत्य मोकळेपणाने सांगू शकेल आणि हा शो तिला अगदी तेच देतो. या फॉरमॅटचा भाग बनण्याचा मला सन्मान वाटतो कारण हा फक्त प्रेरणा देत नाही, तर सहानुभूती वाढवतो आणि देशभरातील घरांमध्ये अर्थपूर्ण संवादांना चालना देतो. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे आम्ही सुरू केलेल्या टोल-फ्री नंबरच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या कथा शेअर करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्या ऐकल्या जातील आणि कदाचित शोमध्येही दाखवल्या जातील.”

‘कहानी हर घर की’ हा फक्त मनोरंजनापुरता शो नाही. हा प्रेक्षकांना जोडणारा, विचार करायला लावणारा आणि धैर्य देणारा प्रवास आहे कारण प्रत्येक घराची एक कथा असते… आणि काही कथा अशा असतात ज्या ऐकल्या जाणे अत्यंत गरजेचे असते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…