Home क्राईम जीप झाडाला धडकून चालकासह १२ महिला जखमी

जीप झाडाला धडकून चालकासह १२ महिला जखमी

4 second read
0
0
31

no images were found

जीप झाडाला धडकून चालकासह १२ महिला जखमी

चंदगड : कलिवडेनजीक (कलानिधीगड- पाटणे फाटा ते तिलारीदरम्यान) चालकाचा ताबा सुटल्याने जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातात कालिवडे भागातील १२ महिला जखमी झाल्या असून चालक महेश मारुती डुरे (रा. मजरे कार्वे, ता. चंदगड) हा गंभीर जखमी झाला आहे.

जंगमहट्टी जवळ असणाऱ्या एका काजू कारखान्यामध्ये रोजंदारीवर १२ महिला रविवारी सायंकाळी कामावर   आल्या होत्या. आपली ड्युटी संपवून त्या कारखान्याच्या जीपने (केए २०-एन-२११३) जात असताना  हा अपघात घडला. अपघातातील जखमी महिलांची नावे :- शालन गुरव, पूनम कांबळे, ठकाताई कोकरे, छाया मोरे, जयश्री कांबळे, शोभा कांबळे, सुमित्रा कांबळे, गीता कांबळे, अनिता कांबळे, मोनाली कांबळे, बमाबाई लांबोर, नीलम कांबळे, आरती गावडे (सर्व रा. कलिवडे). सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…