no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत बापोद्रा आणि सोनल पुष्पाच्या घरात राहू लागल्याने नव्या गोंधळाची सुरुवात
प्रेरणादायक कथानक आणि भावनात्मक दृष्ट्या समृद्ध व्यक्तिरेखा यांच्यामुळे सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेने प्रेक्षकांचे मन काबिज केले आहे. पुष्पा (करुणा पांडे) आपले वकील बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे, पण येथेही तिच्यासमोर नवी आव्हाने येत आहेत, ज्यामध्ये तिच्या दृढतेची आणि तिच्या जवळच्या नातेसंबंधांचीही परीक्षा होत आहे. अलीकडच्या भागांमध्ये आपण पाहिले की, जुगल (अंशुल त्रिवेदी) आणि पुष्पा कादंबरी (वृंदा त्रिवेदी)च्या गरोदरपणाच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
परंतु, कादंबरीचे गरोदरपणाचे नाटक सुरूच आहे आणि पुष्पाला सगळ्या आघाड्यांवर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे हताश झालेल्या प्रोफेसर शास्त्रींना नवी आशा देऊन त्यांच्या मुलीशी असलेले त्यांचे नाते सुधारावे यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत, तर घरी, कादंबरीच्या त्रासदायक उपस्थितीमुळे प्रार्थना प्रभावित होऊ लागली आहे. या गोंधळात भर म्हणून बापोद्रा (जयेश भारभाया) कुटुंब तात्पुरते तिच्या घरात राहायला येते. यामुळे एक नवीन तणाव उभा राहतो, कारण बापोद्रा प्रार्थना (इंद्राक्षी)ला पुन्हा आपल्यासोबत राहायला येण्यासाठी पटवतो.
ही परिस्थिती पुष्पा कशी हाताळणार?
पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “बापोद्रा आणि सोनल पाहुणे म्हणून घरी राहायला आल्यामुळे पुष्पाच्या जीवनात नवे नाट्य आणि विनोद निर्माण झाला आहे. या अनपेक्षित गोंधळात आपले घर सांभाळण्यासाठी पुष्पा जो खटाटोप करते, ते आव्हानात्मक आणि मजेदार देखील आहे. त्यात नवीन पाहुणे आणि एकाच छताखाली त्यांच्यातील नात्यांचे भावनिक आयाम बघायला मिळतील. प्रेक्षकांना त्यातील गंमत आणि आगंतुक पाहुण्यांमुळे निर्माण झालेला तणाव बघायला आवडेल.”