no images were found
राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डयांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित
कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर येणा-या रस्त्यांवर असलेल्या खड्डयांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 18002331548 कार्यान्वित करण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करुन सार्वजनिक बांधकाम विभागास खड्डेमुक्त रस्ते वापरात ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे सहायक मुख्य अभियंता मिलिंद बारभाई यांनी केले आहे.
हा दुरध्वनी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरु असणार आहे. सामान्य नागरिकांना जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या खड्ड्याबाबत काही तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी ती वरील दुरध्वनी क्रमांकावर नोंदवावी.
तक्रार नोंदविताना कृपया आपले नाव व दुरध्वनी क्रमांक सुध्दा नोंदवावा. जेणेकरुन आपल्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल आपणास कळविणे शक्य होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी विभागाने आपले संकेतस्थळ www.mahapwd.com यावर ‘Citizen’ या भागात ‘Pothole Related Complaint’ मध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.