Home शासकीय नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी एक दिवसीय प्रशिक्षण सत्र

नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी एक दिवसीय प्रशिक्षण सत्र

2 second read
0
0
181

no images were found

नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी एक दिवसीय प्रशिक्षण सत्र

कोल्हापूर : नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास इच्छुक उमेदवार व उद्योजकांसाठी नोंदणीकृत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरीता दिनांक १४ऑक्टोबर रोजी तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. स्टार्टअप यात्रेकरिता वयाची अट नसल्याने जिल्ह्यातील जास्तीत-जास्त उद्योजक, विद्यार्थी  व नाविन्यता परिसंस्थांनी सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

यात पहिल्या सत्रामध्ये सकाळी १० वाजता विभागाच्या विविध योजनांची माहिती, स्टार्टअपच्या प्रवासातील टप्पे याबाबत मार्गदर्शन व स्थानिक उद्योजकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. दुस-या सत्रात दुपारी १२ वा. सादरीकरणची संधी देण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवार/ उद्योजकांनी सादरीकरणावेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल ३ विजेते घोषित केले जातील. तसेच  यामध्ये सर्व क्षेत्राचा समावेश असेल उदा. कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन,स्वच्छ पाणी,उर्जा इ.), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, इतर कुठलीही समस्या व त्यावरील उपाय जो नाविन्यपूर्ण आहे इत्यादी.

नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी व उद्योजकांनी आपल्या नवकल्पना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या संकेतस्थळावर भेट देवून नोंदवावी. अधिक माहितीकरिता जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर दूरध्वनी क्र. ०२३१-२५४५६७७ वर संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…