
no images were found
नगररचना विभागाकडील तक्रारी दर गुरुवारी नगररचना कार्यालयात स्विकारणार
कोल्हापूर : नगररचना विभागाकडील कामांबाबत व तक्रारींबाबत नागरीकांना प्रशासक नगररचना कार्यालयात दर गुरुवारी दुपारी 3.30 ते 5.30 या कालावधीत भेटणार आहेत. शासन परिपत्रकानुसार शहरातील नागरीकांना भेटणेसाठी महापालिकेने बुधवार व गुरुवार असे दोन दिवशी निश्चित केलेले आहेत. या दिवशी शहरातील नागरीकांच्या विविध समस्या व तक्रारीबाबत प्रशासक कार्यालयात नागरीक भेटावयास येतात. यावेळी प्रशासक तथा आयुक्त नागरीकांच्या तक्रारींची, कामांची दखल घेऊन त्यांचे समाधान करण्याच्या दृष्टीने बुधवार व गुरुवारी आयुक्त कार्यालयात भेटतात. या भेटीदरम्यान प्रशासनाला असे निदर्शनास आले की नगररचना विभागाकडील तक्रारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे निश्चित करुन दिलेल्या वेळेमध्ये दि.1 ऑक्टोंबरपासून बदल करण्यात आला आहे. यामध्ये नगररचना विभागाकडील नागरीकांच्या तक्रारीबाबत भेटीसाठी प्रत्येक गुरुवारी दुपारी ३.३० ते सायं.०५.३० या वेळेत राजारामपुरी येथील सहाय्यक संचालक नगररचना कार्यालय येथे नागरीकांच्या तक्रारी घेण्यात येणार आहेत. तर नगररचना विभागा व्यतिरिक्त अन्य विभागांच्या तक्रारींसाठी प्रत्येक बुधवारी दुपारी ३.३० ते सायं ०५.३० या वेळेत मुख्य इमारत प्रशासक कार्यालयात नागरीकांच्या तक्रारी स्विकारण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरीकांनी आपल्या तक्रारी महापालिकेने निश्चित करुन दिलेल्या वेळेत व निश्चित केलेल्या ठिकाणी नोंदवाव्यात असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.