
no images were found
दीपिका रणवीरचा होणार काडीमोड?
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बॉलिवूडमधील. एनसर्वाधिक चर्चेत असणारे जोडपं आहे. या जोडप्यावर प्रेम करणारे अनेक चाहते आहेत. दीपिका ही गरोदर असून रणवीर तिची काळजी घेताना दिसत आहे. मात्र, मंगळवारी अचानकपणे रणवीरने आपल्या लग्नातील फोटो डिलीट केल्याने चाहत्यांना धक्का बसला. दीपिका आणि रणवीरच्या नात्यात काही बिनसलं आहे का, याची चर्चादेखील सुरू झाली आहे. दीपिकानेदेखील आपल्या इन्स्टा अकाउंटवरून लग्नाचे फोटो डिलीट केले असल्याचे समोर आले आहे.
रणवीरने आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केल्यानंतर चाहत्यांनी दीपिकाच्या अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट झाले असल्याचे आढळून आले. दीपिका पदुकोणने तीन वर्षांपूर्वीच आपल्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. दीपिकाने 1 जानेवारी 2021 रोजी आपल्या सगळ्या पोस्ट हाइड केल्या आणि इन्स्टाग्रामवर नव्याने सुरुवात करत असल्याची हिंट दिली होती.
दीपिकाने चाहत्यांसाठी एक ऑडिओ मेसेज शेअर केला होता. यामध्ये तिने म्हटले होते की,”सर्वांना नमस्कार, माझ्या ऑडिओ डायरीमध्ये स्वागत आहे, जी माझ्या विचारांची आणि भावनांची नोंद आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्व माझ्याशी सहमत व्हाल की 2020 हे सर्वांसाठी अनिश्चिततेचे वर्ष होते. पण माझ्यासाठी, ते कृतज्ञ असण्याबद्दल देखील होते. 2021 हे वर्ष माझ्यासह सर्वांना आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देत असल्याचे दीपिकाने म्हटले.दीपिकाने रणवीरसह आपल्या लग्नाचा फोटो पुन्हा रिस्टोअर करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपिकाने हा फोटो अनअर्काइव्ह केला होता.
सूत्रांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका रणवीरच्या वैवाहिक आयुष्यात कोणताही मिठाचा खडा पडला नाही. या सगळ्या चर्चा खोट्या आणि निराधार आहेत. दोघेही आपल्या शूटिंगमधून वेळ काढून एकत्र वेळ घालवत आहेत. दीपिका गरोदर झाल्यानंतर रणवीर तिची खूप काळजी घेत आहे. त्यांनी फक्त लग्नाचे नव्हे तर 2022-2023 पूर्वीचेदेखील फोटो हटवले आहेत. तर, अलीकडील काळातील दोघांचेही फोटो त्यांच्या अकाउंटवर आहेत असेही सूत्रांनी सांगितले.