no images were found
बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक गावात दवंडी देवून जनजागृती करण्यात येणार
कोल्हापूर : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात बाल विवाह होऊ नयेत म्हणून प्रत्येक गावात आठवड्यातून किमान दोन वेळा दवंडी देऊन बालविवाह विषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी कळविले आहे.
गावात बालविवाह होत असल्यास तातडीने थांबविण्यात यावा व चाईल्डलाईन 1098 वर फोन करुन अवगत करण्यात यावे. बालविवाह होणार असल्याची पूर्व माहिती मिळाल्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही श्री. वाईंगडे यांनी कळविले आहे.