Home मनोरंजन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्करचे सर्जनशील कौशल्य दिसणार ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्करचे सर्जनशील कौशल्य दिसणार ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत

3 second read
0
0
78

no images were found

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्करचे सर्जनशील कौशल्य दिसणार ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत

सोनी सबवर अलीकडेच सुरू झालेल्या ‘इत्ती सी खुशी’ मालिकेचे हृदयस्पर्शी कथानक आणि सुसंबद्ध व्यक्तिरेखा यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रसारित होत असलेल्या या मालिकेत अन्विता (सुम्बुल तौकीर खान) या तरुणीचा जीवन प्रवास मांडला आहे. जीवनाच्या अत्यंत खडतर अनुभवात देखील छोटे छोटे आनंदाचे क्षण शोधणारी ही तरुणी आहे.या मालिकेची सर्जनशील बाजू सांभाळत आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्कर. या मालिकेच्या माध्यमातून आपले सिनेमॅटिक कौशल्य आणि भावनांचे गहिरेपण ते टेलिव्हिजनच्या पडद्यावर साकारत आहेत. ‘फरारी की सवारी’ आणि ‘व्हेंटिलेटर’ सारख्या चित्रपटांबद्दल ओळखल्या जाणाऱ्या मापुस्कर यांच्या कलाकृतींमध्ये मानवी भावनांचे हृद्य आणि लोभस चित्रण असते. ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत त्यांनी जीवनाच्या कडू-गोड वास्तविकता दर्शविणारे कथानक गुंफले आहे. जे प्रेक्षकांना नक्कीच प्रेरक आणि वेधक वाटेल.

   मालिकेतील आपल्या योगदानाविषयी बोलताना राजेश मापुस्कर म्हणाले, “टेलिव्हिजनकडे घराघरात पोहोचण्याची एक अर्थपूर्ण प्रभाव उत्पन्न करण्याची ताकद असते. जेव्हा सोनी सब आणि रोझ प्रॉडक्शन्स यांनी ‘शेमलेस’ ची निर्मिती भारतीय प्रेक्षकांसाठी करण्याचे ठरवले, तेव्हा कथानक पुन्हा सांगण्याचे एक आव्हान तर होतेच शिवाय कथानकाचे मर्म कायम राखून ते भारतीय संस्कृतीच्या रंगात सादर करणे देखील गरजेचे होते. एक क्रिएटिव्ह मार्गदर्शक म्हणून माझी भूमिका ही आहे की कथानकातील अस्सलता हरवणार नाही याची दक्षता घेऊन कथानक घडवण्यात टीमचे मार्गदर्शन करणे. आम्ही पटकथा लेखन, व्यक्तिचित्रण आणि कलाकारांची निवड करण्याबाबत खूप काटेकोर राहिलो. आणि प्रत्येक घटकातून भारतीय कुटुंबातील दिसणारा सहजपणा आणि आपुलकी व्यक्त होईल याची काळजी घेतली. साधेपणा हेच ‘इत्ती सी खुशी’ चे वैशिष्ट्य आहे. ही सामान्य लोकांची आणि त्यांच्यातील अद्भुत लवचिकतेची कहाणी आहे, जी वास्तविक पद्धतीने सांगितली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना ती नक्की आपलीशी वाटेल. मला आशा आहे की प्रेक्षक स्वतःला या व्यक्तिरेखांमध्ये बघतील आणि ‘इत्ती सी खुशी’ मधून व्यक्त होणारा प्रामाणिकपणा आणि त्यातील ऊब प्रेक्षकांना जाणवेल.”राजेश मापुस्कर यांचे क्रिएटिव्ह कौशल्य लाभलेली ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच एक आकर्षक आणि भावनिक दृष्ट्या समृद्ध अनुभव देईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…