चित्रपट – नाटकांत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातले असल्याने मध्यमवर्गीय विचारसरणीनुसारच जीवनक्रम असावे, असे त्यांच्या घरच्यांना वाटत होते. त्यांच्या नाटकात जाण्याला घरच्यांचा विरोध होता. त्यांनी देखील नियमितपणे नोकरी केली. पण त्याव्यतिरिक्त मिळणारा वेळ ते नाटकात घालवू लागले. वयाच्या विसाव्या वर्षीपासून …