
no images were found
चित्रपट – नाटकांत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातले असल्याने मध्यमवर्गीय विचारसरणीनुसारच जीवनक्रम असावे, असे त्यांच्या घरच्यांना वाटत होते. त्यांच्या नाटकात जाण्याला घरच्यांचा विरोध होता. त्यांनी देखील नियमितपणे नोकरी केली. पण त्याव्यतिरिक्त मिळणारा वेळ ते नाटकात घालवू लागले.
वयाच्या विसाव्या वर्षीपासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. मराठी, हिंदी चित्रपट आणि मलिकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांची 97 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.
कारकीर्दीला सुरुवात केली तेव्हा त्यांना सातत्याने अपयश येत होते. पण ते अपयशातून सारावले. रंगभूमीवरचे कुठलेही काम त्यांनी वर्ज्य मानले नाही. ते पडद्यामागे देखील वावरले. त्यांनी अनेकदा प्रॉम्टिंग केले, प्रॉपर्टी मांडण्याचे काम केले, पार्श्वसंगीत देखील वाजवले. मात्र, नंतर त्यांना मागे वळून पाहण्याची आवश्यकता भासली नाही. मराठी बरोबरच हिंदी चित्रपट सृष्ट्रीत देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
इना मिना डीका, कुरुक्षेत्र, गुलाम-ए-मुस्तफा, तेरा मेरा साथ रहें, प्रतिसाद : द रिस्पॉन्स,
बडे दिलवाला, युगपुरुष, रॉकी हॅन्डसम, लव्ह का तडका, वास्तव : द रिॲलिटी, सिंघम आदी हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले.